आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनडीटीव्हीच्या किरकोळ गुंतवणूकदारांना अतिरिक्त उत्पन्न होणार आहे. अदानी एंटरप्रायजेसच्या ओपन ऑफरमध्ये भाग घेेणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनी ४८.६५ रुपये प्रति शेअर अतिरिक्त पैसे देणार आहेत.
कंपनीने मंगळवारी दिलेल्या निवेदनानुसार, हा निर्णय एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी त्यांच्या शेअरसाठी दिलेला भाव आणि ओपन ऑफरच्या भावातील अंतर कमी करण्यासाठी केले आहे. अदानी एंटरप्रायजेसने एनडीटीव्हीचे शेअर विकत घेण्यासाठी गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरदरम्यान ओपन ऑफर आणली होती. यात भाग घेणाऱ्या शेअरधारकांना २९४ रुपये प्रति शेअर देण्यात आले होते. याच्या तुलनेत रॉय दंपतीला ३४२.६५ प्रति शेयर पेमेंट केले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.