आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Adequate Reserves Of Edible Oil In India; Prices, Attention To Supply Situation: Ministry Of Food

नवी दिल्ली:भारतात खाद्यतेलाचा पुरेसा साठा; किमती, पुरवठा परिस्थितीवर लक्ष : अन्न मंत्रालय

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे आणि ते किमतीवर तसेच पुरवठ्याच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे.

“भारतात सर्व खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे. उद्योग सूत्रांनुसार, देशातील सर्व खाद्यतेलाचा सध्याचा साठा २१ लाख टन अंदाजे आहे आणि १२ लाख टन अंदाजे मे २०२२ मध्ये पोहोचणार आहे असे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे, इंडोनेशियाने निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशाकडे काही कालावधीसाठी पुरेसा साठा आहे, असेही त्यात म्हटले आहे. तेलबियांच्या आघाडीवर, कृषी मंत्रालयाच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर झालेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजाने २०२१-२२ या वर्षासाठी १२६.१० लाख टन सोयाबीन उत्पादनाचे अतिशय सकारात्मक चित्र दाखवले आहे, जे गेल्या वर्षीच्या ११२ लाख टन उत्पादनापेक्षा जास्त आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत राजस्थानसह सर्व प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मोहरीची पेरणी ३७ टक्क्यांनी जास्त झाल्यामुळे २०२१-२२ हंगामात उत्पादन ११४ लाख टनांपर्यंत वाढू शकते. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग किंमत आणि उपलब्धता परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती आणि एमआरपीमध्ये आणखी कपात करण्यावर चर्चा करण्यासाठी प्रमुख खाद्य तेल प्रक्रिया संघटनांसोबत नियमितपणे बैठका घेतल्या जातात,” निवेदनात म्हटले आहे. एकूण आयात केलेल्या खाद्यतेलापैकी पामतेल (क्रूड आणि रिफाइंड) हे सुमारे ६२ टक्के आहे. प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जातात. सोयाबीन तेल (२२ %) अर्जेंटिना व ब्राझीलमधून आयात केले जाते. सूर्यफूल तेल (१५ टक्के) प्रामुख्याने युक्रेन आणि रशियामधून आयात केले जाते.

बातम्या आणखी आहेत...