आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After 8 Years, The Company Has Launched 6 New Laptops In The Indian Market, Priced From Rs 38,990

सॅमसंगने लाँच केले 6 नवीन लॅपटॉप:8 वर्षांनंतर कंपनीचे भारतीय बााजारात नवीन 6 लॅपटॉप, किंमत 38,990 रुपयांपासून

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने भारतात नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. भारतीय लॅपटॉप मार्केटमधून कंपनी बऱ्याच दिवसांपासून गायब होती. कंपनीने भारतात एकूण 6 लॅपटॉप लॉन्च केले आहेत. यामध्ये गॅलेक्सी बुक 2 360, गॅलेक्सी बुक 2 Pro 360, गॅलेक्सी बुक 2 बिझनेस आणि गॅलेक्सी बुक गो यांचा समावेश आहे.

यातील सर्वात स्वस्त लॅपटॉप गॅलेक्सी बुक गो आहे. या लॅपटॉमध्ये इंटेल नाही, तर या लॅपटॉपमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7c जेन 2 चिपसेट देण्यात आले आहे. क्वॉलकॉम सामान्यपणे मोबाइल प्रोसेसर बनवते.

लॅपटॉपची किंमत

या लॅपटॉपची किंमत 38,990 रुपयांपासून सुरू होते. कंपनीने कॅशबॅक ऑफर देखील जाहीर केली आहे. यामध्ये तुम्हाला रु.3,000 पर्यंतचा झटपट कॅशबॅक मिळू शकतो. गॅलेक्सी बुक 2 ची किंमत 65,990 रुपये आहे, तर गॅलेक्सी बुक 2 360 ची किंमत 99,990 रुपये आहे.

गॅलेक्सी बुक 2 Pro ची किंमत 106,990 रुपयांपासून सुरू होते. गॅलेक्सी बुक 2 ची किंमत 104,990 पासून सुरू होते.

फोनचे अनेक फीचर्स लॅपटॉपमध्ये
या अत्याधुनिक लॅपटॉप्स मध्ये इंटेलचे 12व्या पिढीचे चिपसेट दिले गेले आहे. जे 10nm फॅब्रिकेशन प्रक्रियेवर तयार केले गेले आहेत. त्याला इंटेल 7 म्हणतात. सॅमसंगने या लॅपटॉपमध्ये गॅलेक्सीचे अनेक सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्स दिले आहेत. यामध्ये बिक्सी बाय, लिंक शेअरिंग, क्विक शेअर, सॅमसंग गॅलरी, सॅमसंग नोट्स आणि सेकंड स्क्रीन या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
अनेक वर्षांनंतर सॅमसंग भारतीय लॅपटॉप बाजारात उतरली आहे. आता ग्राहक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या बाजारात स्पर्धा खूप जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...