आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील (BSE) सेन्सेक्स 276.46 अंकांनी किंवा 0.51% घसरून 54,088.39 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) निफ्टी देखील -72.95 (-0.45%) घसरला. तो 16,167.10 च्या पातळीवर बंद झाला. सर्वात मोठी घसरण आयटी आणि वाहन क्षेत्रातील समभागात झाली.
आठवाड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बाजाराची सुरूवात सकारात्मक वाढीसह झाली होती. सुरुवातीला बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्स 180 अंकांच्या वाढीसह 54,544 अंकांवर उघडला होता. तर निफ्टी 16,270 वर उघडला होता.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले. मिडकॅप निर्देशांक 101.79 अंकांनी किंवा 0.46% घसरून 22,140.97 वर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक 582.66 अंकांनी किंवा 2.23% घसरून 25,495.92 वर बंद झाला. मिडकॅपमध्ये सर्वाधिक 9.74% ची घसरण रुची सोयामध्ये दिसून आली. जेएसडब्ल्यू एनर्जी, अदानी पॉवर, एनएचपीसी, आयआरसीटीसी आणि आरबीएल बँकही घसरणीसह बंद झाले.
11 पैकी 6 क्षेत्रीय निर्देशांक घसरले
राष्ट्रीय शेअर बाजारातील 11 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 6 घसरले. निफ्टी आयटीमध्ये 1.24% ची सर्वात मोठी घसरण झाली. निफ्टी ऑटो देखील 0.91% च्या तोट्यासह बंद झाला. FMCG निर्देशांक 0.69% आणि PSU बँक 0.53% ने घसरला. निफ्टी रियल्टी 0.73% आणि निफ्टी बँक 0.61% वधारले.
डेल्हीव्हरीचा IPO उघडला
लॉजिस्टिक कंपनी डेल्हीव्हरीचा इश्यू आज उघडला आहे आणि 13 मे रोजी बंद होईल. इश्यू उघडण्यापूर्वी डेल्हीव्हरीने अँकर गुंतवणूकदारांकडून 2,400 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने 5,235 कोटी रुपयांचा इश्यू आणला आहे.
रुपया झाला मजबूत
आज रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन 77.17 रुपये प्रति डॉलर झाला आहे. याआधी शुक्रवारी रुपयाने प्रति डॉलर 77.42 या सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.