आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After ICICI Bank Now Axis Bank Revises Interest Rates, Domestic Fixed Deposits Below 2 Crore, Latest News And Update,

एफडीवर मिळणार अधिकचा परतावा:आयसीआयसीआय नंतर आता AXIS बॅंकेने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले, 6.15% पर्यंत मिळेल व्याज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआयसीआय (ICICI) बँकेनंतर आता Axis बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात 55 बेसिस पॉइंट्सने (bps) वाढ केली आहे. या बँकेच्या ग्राहकांना आता एफडीवर अधिक व्याज मिळणार आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली. याबाबत अ‌ॅक्सिस बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, नवीन व्याजदर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

2.75% ते 6.15% पर्यंत मिळेल व्याज
आता तुम्हाला अ‌ॅक्सिस बॅंकेत एफडी केल्यावर 2.75% ते 6.15% पर्यंत व्याज मिळेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे. यामुळे अ‌ॅक्सिस ब‌ॅंकेनेही एफडीचे दर वाढवले आहेत.

RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली
RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली आहे. यासह रेपो दर 5.40% वरून 5.90% झाला आहे. म्हणजेच, गृह कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग असू शकते आणि आता तुम्हाला अधिक ईएमआय देखील भरावा लागेल.

Axis Bank मधील FD वर किती व्याज मिळेल

ICICI बँकेनेही FDवरील व्याजदरात वाढ केली
अ‌ॅक्सिस बॅंकेच्या आधी आयसीआयसीआय बँकेने एफडीवर व्याजदर वाढवले ​​आहेत. ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर व्याजदरही वाढवले ​​आहेत. ICICI बँकेचे नवीन व्याजदर 30 सप्टेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.

FD मधून मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो

एखाद्या आर्थिक वर्षात बँक एफडीवर मिळणारे व्याज 40 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ही मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी आहे. त्याचवेळी 60 वर्षांवरील, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नावर 10% TDS कापला जातो.

5 वर्षांच्या FD वर कर सूट मिळते
5 वर्षांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयकर सूट देखील मिळते. तुम्हाला व्याजावर तसेच त्यात जमा केलेल्या मूळ रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, कोणत्याही एका आर्थिक वर्षात तुमच्या FD वर मिळालेले व्याज रु. 10,000 पेक्षा जास्त असल्यास 10% दराने TDS कापला जाईल.

बातम्या आणखी आहेत...