आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खाण्याच्या बहुतांश सामग्रीवर जीएसटीचा दर ५% आहे. मात्र, पॉपकॉर्नला सामान्य खाद्यातून हटवून विशेष श्रेणीत समाविष्ट केले आहे. आता पॉपकॉर्नवर १८ टक्क्यांच्या दराने जीएसटी लावला आहे. कॉर्न म्हणजे मक्याच्या पॅकेटवर ५ टक्के दरानेच जीएसटी लागेल. मात्र, खाण्यासाठी तयार पॉपकॉर्नवर १८ टक्के जीएसटी लागेल. अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंग(एएआर)ने हा निर्णय घेतला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण देशात एक कर प्रणाली असावी यासाठी मोदी सरकारने हा कर आणला. यामुळे व्यवसाय सुलभ होईल आणि कर संकलनही चांगले होईल. मात्र, अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या शेकडो वर्गवारीमुळे व्यावसायिक अाणि ग्राहकांमध्येही संभ्रम आहे. एएआर जो दर निश्चित करतो, त्यांच्याशी अनेक लोक सहमत नाहीत. पॉपकॉर्न तयार करणारी सुरतची कंपनी जय जलराम एंटरप्रायझेसने एएआरकडे विनंती केली की, त्यांच्या उत्पादनावर ५ टक्के दराने जीएसटी लावावा. कारण, यामध्ये मका आहे आणि हे एक प्रकारचे धान्य आहे. धान्यांवर ५ टक्के जीएसटी आहे. मात्र, एएआरने विनंती फेटाळली. आता १८ टक्के जीएसटी लागेल. या महिन्याच्या सुरुवातीस कर्नाटकमध्ये अशा प्रकारचे वृत्त आले होते. तेव्हा पराठा सामान्य चपाती मानण्यास नकार देऊन त्यावर १८ टक्के दराने कर लावला. एएआरच्या कर्नाटक पीठानुसार, पराठ्याला तेल लावले जात असल्याने ती सामान्य रोटी/चपाती नाही. रोटीवर ५ टक्के दराने जीएसटी लावला.
वेगवेगळ्या सामग्रींवर जीएसटी पाच स्लॅबमध्ये ठेवला आहे. हा ३ टक्के, ५ टक्के, १२ टक्के आणि २८ टक्के आहे. असे असले तरी जीएसटीच्या वर अनेक प्रकारचा सेस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गवारीमुळे अनेक उद्योगही संभ्रमात आहेत. जुलै २०१७ मध्ये जीएसटी सुरू झाल्यानंतर ही व्यवस्था लागू झाली. वेगवेगळ्या श्रेणीत ३ ते २८ टक्के दराने लागतो जीएसटी -------------
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.