आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After Recruitment Of Senior Posts, Indian Companies Are Looking For New Trainees

नाेकऱ्यांचा पाऊस:वरिष्ठ पदांच्या भरतीनंतर भारतीय कंपन्या नव्या प्रशिक्षणार्थींच्या शाेधात

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाची दुसरी लाट संपताच देशभरात नाेकरभरतीचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडेच वरिष्ठ पातळीवरील आणि अनुभवी व्यक्तींची भरती केल्यानंतर आता भारतीय कंपन्यांनी ताज्या दमाच्या नव्या कर्मचाऱ्यांची (प्रशिक्षणार्थी) भरती करण्यावर भर दिला असल्याचे रिक्रुटमेंट संस्थांकडून मिळालेल्या माहितीत दिसून आले आहे.

टीम लीज स्किल्स युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या सहामाही कालावधीत जवळपास ४५ टक्के नियाेक्त्यांनी नवीन किंवा अॅप्रेंटीससाठी भरती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जवळपास ६४ टक्के नियोक्त्यांना त्यांच्या मनुष्यबळात नवीन कर्मचाऱ्यांची (प्रशिक्षणार्थी) संख्या वाढवण्याचा विचार केला आहे. छोट्या व्यवसायात भरती करण्याचा विचार हा आधीच्या सहामाहीतील ८ टक्क्यांच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत वाढून २३ टक्क्यांवर गेला आहे. तर मध्यम व्यवसायामध्ये ३७ टक्क्यांच्या तुलनेत ताे ४२ टक्क्यांवर गेला आहे. माेठ्या व्यवसायांमध्ये भरती करण्याचा हेतू हा पहिल्या सहामाहीतील ५० टक्क्यांवरून ६१ टक्क्यांवर गेला आहे. महिलांची भरती करण्याचा हेतू जुलै-डिसेंबर २०२० मध्ये २३ टक्के हाेता. आता ताे जुलै- डिसेंबर वा काळात ३२ टक्क्यांवर गेला आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या उणिवा दूर करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हे यामागील मुख्य कारण आहे.

४५ % नियोक्ता या सहामाीत करतील भरती
काेविडचे संकट असतानाही २०२१ प्रशिक्षणार्थीसाठी चांगले वर्ष आहे. बहुतांश नियाेक्त्यांनी यांची क्षमता आेळखून त्यांची भरती करण्याचा सतत विचार केला आहे. प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या भत्त्यामध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. - सुमीत कुमार, उपाध्यक्ष, टीम लीज स्किल्स युनिव्हर्सिटी

आयटी क्षेत्रात डिजिटल काैशल्य मागणीत वाढ
‘क्वॅस’ीच्या सर्वेक्षणानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फुल स्टॅक, रिअॅक्ट जेएस, अँड्रॉइड, अँग्युलर जेएस आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तंत्रज्ञान यासारखी डिजिटल कौशल्य असलेल्या लोकांची मागणी तिमाही आधारावर ३००% वाढली आहे.

प्रशिक्षणार्थीची सर्वाधिक भरती करणारी शहरे
लखनऊ : 79%
अहमदाबाद : 69%
चेन्नई : 65%

नव्या कर्मचाऱ्यांची भरती हाेणारी प्रमुख क्षेत्रे
उत्पादन आणि अभियांत्रिकी : 68%
वाहन आणि अॅन्सलरीज : 58%

मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी भरती
- प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून काैशल्य त्रुटी कमी करणे
- काेविडमुळे झालेला कर्मचारी मनुष्यबळ तुटवडा कमी करणे
- खर्चावर प्रभावीपणे नियंत्रण आणणे

बातम्या आणखी आहेत...