आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • After Reducing The Repo Rate Of RBI, There Will Be Savings Of Rs 960 In Monthly Installment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेपो रेट:40 लाखांच्या कर्जावर दर महिन्याच्या ईएमआयवर 960 रुपयांची बचत, पुढील महिन्यापासून होईल सुरुवात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिटेल लोनमध्ये होम लोन, कार लोन, एजुकेशन लोन इ. येतात

भारतीय रिजर्व बँक (आरबीआय)ने शुक्रवारी रेपो रेटमध्ये 40 बीपीएसमध्ये केलेल्या कपातीनंतर कर्जदात्यांना मोठी सवलत मिळाली आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, तर त्याच्या महिन्याच्या ईएमआयमध्ये 960 रुपयांची बचत होईल. म्हणजेच, आरबीआयच्या या निर्णयामुले ग्राहकांना वार्षिक 11,520 रुपयांची बचत होईल.ईबीएलआरसोबत आल्यावरच होईल फायदा

उदा.- जर एखाद्या ग्राहकाने 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याला त्यावर 40 बीपीएसच्या आधाराने 960 रुपये दरमहा बचत होईल. त्याचा ईएमआय 40 हजार रुपये असेल, तर आता जून महीन्यापासून त्याला 39,040 रुपयेच भरावे लागतील. परंतू, बँकेतील ग्राहकांना तेव्हाच फायदा होईल, जेव्हा ग्राहक ईबीएलआरशी जोडला असावा आणि त्यासोबतच त्याचा सिबिल स्कोर चांगला असावा. या निर्णयामुळे नोकरी किंवा उद्योग करणाऱ्या ग्राहकाला जास्त फायदा होईल.

मार्चमध्ये 75 बीपीएस कपात केल्यामुळे 1,533 रुपयांचा फायदा झाला होता

किरकोळ कर्जाच्या सर्व ग्राहकांना या कपातीचा फायदा होईल. यात गृह कर्ज, कार लोन, एजुकेशन लोनसारखे ते सर्व कर्ज आहेत, जे रिटेल लोनमध्ये मोडतात. रिटेल लोन बँकांसाठी सर्वात फायद्याचा आहे. यापूर्वी मार्चमध्ये आरबीआयने 75 बीपीएसची कपात केली होती. त्यावेळेस एखाद्याने जर 35 लाख रुपयांचे कर्ज 15 वर्षांसाठी घेतले असते, तर त्याला महिन्याला 1,533 रुपयांचा फायदा ईएमआयमध्ये झाला असता. म्हणजेच, वार्षिक 18,396 रुपयांचा फायदा.

ऑक्टोबर 2019 मध्ये ईबीएलआर लागू झाला होता

ऑक्टोबर 2019 पासून सर्व प्रकारच्या रिटेल लोनला एक्सटर्नल बेंचमार्क लँडिंग रेट (ईबीएलआर)शी जोडले गेले होते. जर एखाद्या ग्राहकाने याचा निर्णय घेतलेला नसेल, तर त्याला याचा फायदा मिळणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो रेट 4% झाला आहे. रेपो रेट तो दर असतो, ज्या दरावर बँक आरबीआयकडून पैसे घेतात. यासोबतच रिवर्स रेपोमध्येही कपात झाली आहे. रिवर्स रेपो म्हणजेच बँक ज्या दरावर आरबीआयकडे पैसे ठेवतात. त्यामुळे आरबीआयच्या निर्णयानंतर एफडी आणि सेविंगसोबतच कर्जाच्या व्याजातही कपात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...