आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After Twitter, Now Layoffs At Meta | Zuckerberg's Biggest Layoff Plan, Investment In Metaverse Costs Company | Marathi News

ट्विटरनंतर आता मेटामध्ये कर्मचारी कपात:झुकरबर्ग यांचा सर्वात मोठा लेऑफ प्लॅन, मेटाव्हर्समधील गुंतवणुकीमुळे कंपनीचे नुकसान

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरनंतर आता मेटा (पूर्वी फेसबुक म्हणून ओळखले जाणारे) अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. नेमके किती लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार, या आठवड्याच्या अखेरीस कर्मचारी कपात सुरू होईल. 2004 मध्ये कंपनीच्या स्थापनेपासूनची ही सर्वात मोठी कपात असू शकते.

मेटामध्ये 87,314 कर्मचारी
सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत, मेटामध्ये 87,314 कर्मचारी होते. मेटा सध्या WhatsApp, Instagram आणि Facebook यासह जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी आहे. तथापि, कंपनी मेटाव्हर्सवर आपला खर्च वाढवत आहे. Metaverse हे एक आभासी जग आहे जिथे वापरकर्ते त्यांचे स्वतःचे अवतार तयार करू शकतात. लॉ एडॉप्टेशन रेट आणि महाग R&D यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. कमर्चारी कपातीमुळे आर्थिक संकट काहीसे कमी होण्याची अपेक्षा आहे.

मेटाव्हर्समध्ये गुंतवणुकीने नुकसान
गेल्या महिन्याच्या अखेरीस, मेटाने डिसेंबर तिमाहीसाठी कमाईचे स्वरूप जाहीर केले. पुढील वर्षी Metaverse मधील गुंतवणुकीमुळे कंपनीचे मोठे नुकसान होईल, असे कंपनीने म्हटले होते. ही माहिती समोर आल्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मेटा स्टॉक या वर्षी 70% पेक्षा जास्त कमी झाला आहे.

तथापि, मेटा CEO मार्क झुकरबर्ग यांनी गुंतवणूकदारांना ब्रँडवर विश्वास ठेवण्यास सांगितले. कंपनीसोबत राहणाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असा दावा त्यांनी केला.

मेटाचे Q3 (जुलै-सप्टेंबर) रिझल्ट

मेटाअमाउंटग्रोथ (on-year)
रेव्हिन्यू$27.7 बिलियन-4%
नेट इन्कम$4.4 बिलियन-52%
ऍव्हरेज रेव्हिन्यू पर युजर$9.41-6%
डेली ऍक्टिव्ह यूजर्स1.98 बिलियन-3%

Metaverse म्हणजे काय आणि फेसबुकने हे नाव का निवडले?
आभासी वास्तविकतेच्या पुढील स्तराला मेटाव्हर्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर मेटाव्हर्स हे एक प्रकारचे आभासी जग आहे. या तंत्रज्ञानामुळे तुम्ही आभासी ओळखीद्वारे डिजिटल जगात प्रवेश करू शकाल. म्हणजेच एक समांतर जग जिथे तुमची वेगळी ओळख असेल.

बातम्या आणखी आहेत...