आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After Two Years Of Marriage And Vacation, 60% Of Hotel Hotel Room Book, 40% Of Hotel Rooms Were Not Filled.

दिव्‍य मराठी एक्सक्लुझिव्ह:विवाह आणि सुट्यांमुळे दोन वर्षांनंतर हॉटेल उद्योगाच्या 60% रूम बुक, हॉटेलच्या खोल्याही 40% भरत नव्हत्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील हॉटेल उद्योग पुन्हा एकदा बहरला आहे. या वर्षी मार्चमध्ये दोन वर्षांनंतर अाॅक्युपसीचे प्रमाण ६० टक्क्यांच्या वर गेले अाहे आणि त्यानंतरच्या महिन्यांत खोल्या अधिक भरल्या जाण्याची शक्यता आहे. लग्नसराई आणि सुट्यांच्या हंगामामुळे उद्योगाला पाठिंबा मिळत आहे. एचव्हीएस अॅनाराॅकच्या अहवालानुसार, कोविड विषाणूच्या अाेमायक्राॅॅन प्रकाराच्या प्रभावामुळे या वर्षी जानेवारीमध्ये हॉटेल उद्योगाची अाॅक्युपन्सी ४०% पेक्षा कमी झाली हाेती. परंतु नंतर फेब्रुवारीमध्ये परिस्थिती थोडी सुधारली आणि अाॅक्युपन्सी ५५% वर पोहोचली. नंतर मार्चमध्ये परिस्थितीत अाणखी चांगली सुधारणा झाल्यावर ऑक्युपन्सी ६१% वर पोहोचली. मार्च २०२० नंतर प्रथमच हॉटेल उद्योगाचा व्यवसाय एवढ्या पातळीवर पोहोचला आहे. लिजर हॉटेल्समधील अाॅक्युपन्सी कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचली आहे, परंतु व्यावसायिक हॉटेल्स सुधारणांच्या बाबतीत अजूनही मागे आहेत..

हॉटेल उद्योगातील तेजीची कारणे
देशातील कोविड प्रकरणांमध्ये घट, निर्बंध संपले
घरातून काम करण्याऐवजी ऑफिसमधून काम सुरू झाले
आंतरराष्ट्रीय विमानांची नियमित उड्डाणे सुरू
कोरोनामुळे लग्न मोठ्या प्रमाणावर लांबणीवर टाकली