आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Air Asia Aviation Group Signs Agreement With Air India, Got CCI Approval In June, TATA Groups Latest News  

एअर एशिया इंडियात आता टाटांची 100% भागीदारी:एअर एशियाने एअर इंडियाशी केला शेअर्स करार; जूनला मिळाली होती CCIची मान्यता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लो कॉस्ट विमान कंपनी असलेल्या एयर एशियाची शंभर टक्के भागीदारी आता टाटा समूहाकडे आली आहे. एअर एशिया एव्हिएशन ग्रुप लिमिटेडने बुधवारी टाटा समूहासोबत शेअर खरेदी करार केला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) जूनमध्ये एअर एशिया इंडियाचे संपूर्ण भाग भांडवल खरेदी करण्याच्या एअर इंडियाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती.

एअर एशिया इंडियात टाटांचा 83.67% हिस्सा
टाटाकडे सद्या एअर एशिया इंडियामध्ये 83.67% हिस्सा आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी एअर एशिया इंडियामध्ये आपला हिस्सा वाढवला. उर्वरित भागभांडवल मलेशियन विमान कंपनी एअर एशियाकडे होती. एअर एशिया इंडिया 'एअर एशिया' या ब्रँड नावाने कार्यरत आहे.

त्याचवेळी, टाटाची एअर इंडियामध्ये 100% भागीदारी आहे. टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या Tales Private Limited ने भारत सरकारकडून एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस 18 हजार कोटीेंना विकत घेतले होते. ही विमान कंपनी सतत तोटा करत होती. टाटा समूह आता तोट्यात चाललेल्या या विमान कंपनीला नफ्यात आणण्यासाठी कार्यरत आहे.

4 एअरलाईन्सला एका छताखाली आणण्याचा प्रयत्न

टाटा सन्सने जानेवारीमध्ये एअर इंडियाची खरेदी केली. त्यानंतर व्यवस्थापन पूर्णपणे नियंत्रण ताब्यात घेतले. तेव्हापासून त्यांनी आपल्या चारही विमान कंपन्यांना एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा, एअर एशिया इंडिया आणि ग्राउंड हँडलिंग फर्म AISATS एकाच कार्यालयातून काम करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...