आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Air India Returned To Tata Group After 68 Years, Nationalized In Attempt To Save Local Aviation Industry

68 वर्षांनंतर टाटाची झाली एअर इंडिया:रतन टाटा म्हणाले 'वेलकम बॅक', 18,000 कोटी रुपयांमध्ये फायनल झाली डील

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाची घरवापसी झाली आहे. टाटा समूह 18,000 कोटी रुपयांना खरेदी करत आहे. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (दीपम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे.

कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग कंपनी AISATS लाही अर्धा हिस्सा मिळणार आहे. स्पाइसजेटच्या अध्यक्षांच्या संघाने 15,000 कोटी रुपयांची बोली लावली होती. 'दीपम'च्या सचिवांनी सांगितले की, ही डील डिसेंबरपर्यंत बंद होईल, म्हणजेच व्यवहार पूर्ण होईल.

काही दिवसांपूर्वी आल्या होत्या खरेदीच्या बातम्या
काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालात दावा करण्यात आला होता की टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली आहे. पण सरकारने टाटा समूहाची बोली स्वीकारल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते आणि सांगितले की या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

अजय सिंगपेक्षा 3 हजार कोटींची अधिक बोली
ब्लूमबर्गच्या याच अहवालानुसार, टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा सुमारे 3,000 कोटी रुपयांची अधिक बोली लावली होती. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती, त्यानंतर टाटा समूह एअर इंडिया खरेदी करू शकेल असा अंदाज होता.

15 ते 20 हजार कोटींची राखीव किंमत
सरकारने एअर इंडियामधील संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. एअर इंडियासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया होते. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाची राखीव किंमत 15,000 ते 20,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

एअर इंडियावर प्रचंड कर्ज
अनेक वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या एअर इंडियाला विकण्याच्या सरकारच्या योजनेत सरकार अपयशी ठरले आहे. 2018 मध्ये 76% हिस्सा विकण्यासाठी बोली मागवली होती आणि व्यवस्थापन नियंत्रण कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते. जेव्हा कोणी त्यात स्वारस्य दाखवले नाही, तेव्हा सरकारने व्यवस्थापन नियंत्रणाने ते विकण्याचा निर्णय घेतला.

2000 पासून विकण्याचा प्रयत्न करत होता
एअर इंडिया विकण्याचा निर्णय प्रथम 2000 मध्ये घेण्यात आला. त्यावर्षी 27 मे रोजी सरकारने त्यातील 40% भागविक्री करण्याचा निर्णय घेतला होता. 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मुंबईतील सेंटॉर हॉटेलसह अनेक कंपन्यांचे निर्गुंतवणूक केले होते. अरुण शौरी तेव्हा निर्गुंतवणूक मंत्री होते.

10% वाटा कर्मचाऱ्यांना मिळणार होता
त्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना 10% आणि देशांतर्गत वित्तीय संस्थांना 10% हिस्सा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर एअर इंडियामधील सरकारचा हिस्सा 40% पर्यंत खाली आला असता. गेली 21 वर्षे एअर इंडियाला विकण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी प्रकरण एका ना कोणत्या कारणाने अडकले.

मंदीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीयीकरण झाले
जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स सुरू केली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात विमान क्षेत्राचा वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत मंदीचा सामना करण्यासाठी नियोजन आयोगाने सर्व विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण सुचवले होते.

बातम्या आणखी आहेत...