आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा ग्रुप एअर इंडियाला नवीन ओळख देणार आहे. याच्या रि-ब्रँडिंगची जबाबदारी लंडनच्या एका डिझाइन कन्सल्टेंसी फर्म फ्यूचरब्रँड्सला सोपवण्यात आली आहे. याशिवाय ग्रुप विमानांना नवे रूप देणार आहे. कंपनीचे नवे मॅस्कॉट असेल आणि बजेट एअरलाइन्ससाठी नवे नावदेखील जोडले जाईल. वास्तविक टाटा समूह आधुनिक जगानुसार एअर इंडियाची प्रतिमा बदलत आहे. या तयारीशी संबंधित लोकांच्या मते, एअर इंडियाला एमिरेट्स आणि सिंगापूर एअरलाइन्स सारखी जागतिक कंपनी बनवण्याचे काम सुरू आहे.
एअर इंडियाची ब्रँड मेकओव्हर टीम 1. फ्यूचरब्रँड्स: अमेरिकन एअरलाइन्स आणि ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड बेन्टलीसोबत काम केले आहे. त्यांनी २०१२च्या लंडन आॅलिम्पिक्सची ब्रँडिंगदेखील केली. 2. कोलिन न्यूब्रोनर: सिंगापूर एअरलाइन्स आणि जेट एअरवेजच्या ब्रँडिंगचे काम केले आहे. 3. सुनील सुरेश: हे मेकमायट्रिपचे पूर्व अधिकारी आहेत.
महाराजा झाले जुने, आता नवे मॅस्कॉट एअर इंडियाची रि-ब्रँडिंग धोरणात नवे मॅस्कॉट तयार करण्यात येणार आहेत. एअरलाइन्सचे ७६ वर्षे जुने महाराजा आता आऊटडेटेड झाला आहे. कंपनी या लोगोचा वापर नव्या फ्लाइटच्या लाँचिंगमध्ये करणार नाही. जानकारांच्या मते, आगामी काही महिन्यात एअर इंडिया वर्ल्ड क्लास ग्लोबल एअरलाइन नव्या रूपात समोर येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.