आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी:व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा कंपनीचा निर्णय; समन्वयक टीमचीही होईल स्थापना

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटाच्या मालकी असलेल्या एअर इंडिया विमान कंपनीच्या वतीने नुकताच वैयक्तिक कामगिरींचा आढावा घेण्यात आला. ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी कंपनीच्या वतीने व्यवस्थापनातील सुधारणांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडिया (AIR INDIA) प्रवाशांना उड्डाणाच्या वेळेत होणारे बदल किंवा विलंब याबद्दलची त्वरीत माहिती देण्यासाठी एक नवीन प्रणाली कार्यान्वित करणार आहे. तसेच कंपनी विमातळावर प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून दूर करण्यासाठी व प्रवाशी व कंपनीतील समन्वय अधिक चांगला होण्यासाठी नवीन टीम देखील स्थापन करणार आहे. कंपनीने अंतर्गतरित्या जारी केलेल्या माहितीबाबत पीटीआयने सांगितले.

विमानतळासाठी स्लॉट मागण्याची शक्यता

काही वृत्तानुसार, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी अंतर्गत जारी केलेल्या माहितीमध्ये सांगितले की, एअरलाइन विमानतळ स्लॉट सुधारण्यासाठी विचार करणार आहे. विमान कंपनीला स्लॉट स्तरावर जे बदल हवे आहेत, ते करण्यासाठी कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.

समन्वयक टीमची स्थापना केली जाणार

जुलै महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेत 8.4 टक्के वाटा असलेली एअरलाइन विमानतळाशी संबंधित समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कंपनी विमानतळ/केंद्र नियंत्रण/प्रादेशिक नियंत्रण समन्वय पथकाची (समन्वय टीम) देखील स्थापना करणार आहे. एअरलाइनची एअरपोर्ट ऑपरेशन टीम (AIR INDIA) कामकाज आणि कामगिरी सुधारण्यासाठी देखभाल कार्यात सहभागी असलेल्या भागीदारांसोबत जवळून काम करित आहे.

विमानामध्ये सेल्फ चेंजची सुविधा असणार

एअर इंडियाने जाहीर केलेल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी व्यवस्था करत आहोत. यामध्ये प्रवाशांना फ्लाइटच्या वेळापत्रकातील बदल किंवा विलंबाबाबत आधीच माहिती देणे समाविष्ट आहे. जेथे योग्य असेल तेथे उड्डाणात स्व-परिवर्तनाची सुविधाही दिली जाईल. टाटांनी यावर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. प्रमुख मेट्रो शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एअर इंडियाने अलीकडेच 24 अतिरिक्त देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...