आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्क यांची ट्विटरमध्ये एंट्री:ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागी होणार एलन मस्क, 2024 पर्यंत श्रेणी-2 चे संचालक म्हणून करणार काम

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेस्ला व स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची लवकरच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळावर वर्णी लागणार आहे. मस्क यांची ट्विटरमध्ये 9 टक्के भागीदारी असल्याची बाब सोमवारी स्पष्ट झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्विटरने यासंबंधीची घोषणा केली. मस्क 2024 च्या स्टॉकहोल्डर्सच्या वार्षिक बैठकीपर्यंत श्रेणी-2 चे संचालक म्हणून ट्विटरच्या संचालक मंडळावर कार्यरत राहतील. या वृत्तानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये चांगलीच तेजी आली आहे.

अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल एका ट्विटद्वारे म्हणाले की, 'एलन मस्क यांना आपल्या संचालक मंडळावर घेताना आम्हाला मोठा आनंद होत आहे. गत काही आठवड्यांतील चर्चेनंतर मस्क आमच्या मंडळाला खूप महत्व देतील हे स्पष्ट झाले आहे. आमच्या कंपनीला दीर्घकालीन मजबूत करण्यासाठी आम्हाला त्यांची बोर्डरूममध्ये गरज आहे. एलन तुमचे स्वागत!'

ट्विटरसोबत काम करण्यास उत्सुक

मस्क या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हणाले, 'येत्या काही महिन्यांत ट्विटरमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी मी पराग व ट्विटर बोर्डासोबत काम करण्यास उत्सुक आहे.' ही बातमी उजेडात आल्यानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये प्री-ओपनिंगमध्ये तब्बल 6 टक्क्यांची तेजी दिसून आली. तत्पूर्वी, सोमवारी मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2 टक्के (7.34 कोटी शेअर्स) भागीदारी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे कंपनीचे समभाग 27 टक्क्यांनी वाढून बंद झाले होते.

एडिट बटनावर वापरकर्त्यांना प्रश्न

तत्पूर्वी, मस्क यांनी ट्विटरच्या फीचरविषयी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी वापरकर्त्यांना तुम्हाला एडिट बटन हवे आहे काय? असा प्रश्न केला होता. एडिट फीचरद्वारे तुम्ही केलेल्या ट्विटला तुम्हाला पुन्हा संपादित करता येईल.

बातम्या आणखी आहेत...