आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Alka Mittal | ONCG | Marathi News |For The First Time, The Command Of ONGC Will Be In The Hands Of A Woman, Alka Mittal Becomes The CMD Of The Company

कुमारच्या जागी मित्तल:देशातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी ONGC च्या चेअरमनपदाची धुरा पहिल्यांदाच महिलेच्या हाती; अलका मित्तल कंपनीच्या CMD

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील दिग्गज ऊर्जा कंपनी 'ऑयल अॅण्ड नॅचुरल्स गॅस कॉर्पोरेशन' ला नवीन चेअरमन मिळाला आहे. डॉ. अल्का मित्तल यांची कंपनीच्या एमडी आणि चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. आता या कंपनीच्या धुरा डॉ. अल्का मित्तल या संभाळणार आहेत. मित्तल ONGC च्या सीनियर डायरेक्टर असून, त्यांना आता चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरची अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुभाष कुमारच्या जागेवर अल्का मित्तल
सुभाष कुमार 31 डिसेंबर 2021 रोजी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अल्का मित्तल यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. अल्का आता कंपनीच्या चेअरमन तथा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारतील. सुभाष कुमारे हे ONGC चे फायनांस डायरेक्टर होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना चेअरमन बनवण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून तर आतापर्यंत ONGC मध्ये फूल टाईम चेअरमनची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

ONGC ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी
ONGC ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी आहे. देशात कच्चे तेल आणि गॅस उत्पादनात कंपनीचा 71% योगदान आहे. ओएनजीसीचे 20 देशांमध्ये 41 प्रकल्प आहेत, अझरबैजान, बांगलादेश, ब्राझील, कोलंबिया, इराक, इस्रायल, इराण, कझाकस्तान, लिबिया, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, रशिया, दक्षिण सुदान, सुदान, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, व्हिएतनाम आणि नवीन झीलँड यात सहभागी होत आहे. ONGC ची स्थापना 1993 मध्ये झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...