आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • All Banks Savings Account Interest Rates Update; Punjab National Bank Cuts Interest, Latest Details; News And Live Updates

आपल्या फायद्याची गोष्ट:बंधन आणि इंडसइंडसह अनेक बँका बचत खात्यांवर देत आहेत 6% पर्यंत व्याज, जाणून घ्या कुठे मिळत आहे किती व्याज

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर तुमचे उत्पन्न करपात्र यादीत येत नसेल तर काय करावे?

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) बचत खात्यावरील व्याज कमी केले आहे. पंजाब नॅशनल बँक आता आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर 2.90% व्याज देत आहे. यापूर्वी ही बँक 3% व्याज देत होती. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही जर या बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर थांबा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आपल्या बचत खात्यावर कोणती बँक किती टक्के व्याज देत आहे.

या बँका बचत खात्यावर देत आहेत जास्त व्याज

बँकव्याज दर (%)
RBL बँक4.25-6.00
बंधन बँक3.00-6.00
इंडसइंड बँक4.00-6.00
यस बँक4.00-5.50
IDFC फर्स्ट बँक4.00-5.00
पोस्ट ऑफिस4.00
ICICI बँक3.00-3.50
HDFC बँक3.00-3.50
पंजाब नेशनल बँक2.90
बँक ऑफ इंडिया2.90
SBI2.70

मासिक सरासरी बँलेन्स लक्षात ठेवा
कोणत्याही बँकेत खाते उघडताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कारण तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे जी बँक कमीत कमी बॅंक बॅलेन्सवर खाते उघडत असेल त्याला प्राधान्य द्या. मासिक सरासरी बँलेन्सकडेही दुर्लक्ष करता कामा नये. शहरी आणि निमशहरीनुसार मासिक सरासरी शिल्लक बदलते. त्यामुळे ही ग्राहकांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे.

जर तुमचे उत्पन्न करपात्र यादीत येत नसेल तर काय करावे?
आयकर स्लॅबनुसार, तुमच्या FD वर मिळणाऱ्या व्याजावरदेखील कर आकारला जातो. एफडीवर मिळणारे व्याज एका वर्षात 10 हजारांवर असेल तर त्यावर टीडीएस कपात होते. हे कपात एकूण मिळणाऱ्या व्याजाच्या 10% असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे. तथापि, जर तुमचे उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी असेल तर तुम्ही FD वर टीडीएस कपातीला परवानगी न देण्यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H सबमिट करू शकता. जर तुमचे उत्पन्न यापेक्षा कमी असेल तर तुमचे टीडीएस कपात होत नाही.

बचत खात्यावरील व्याजावर भरावा लागतो कर
आयकर कायद्याच्या कलम 80 टीटीए अंतर्गत, बँक/सहकारी संस्था/पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यापासून मिळणारे वार्षिक 10,000 रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. याचा लाभ 60 वर्षांखालील व्यक्ती किंवा HUF (संयुक्त हिंदू कुटुंब) साठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट 50 हजार रुपये आहे. जर उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो.

बातम्या आणखी आहेत...