आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय रेल्वे लवकरच प्रवासी सेवा पूर्णपणे पुर्ववत करण्याची शक्यता आहे. पुढील दोन महिन्यांत ते कोविडच्या पुर्वीच्या स्थितीत येऊ शकतात. परंतु राज्य सरकारने यासाठी मंजुरी देणे आणि कोविडची परिस्थितीत नियंत्रणात येणे महत्त्वाचे आहे.
रेल्वे सेवा सुरळीत झाल्यास सर्व विशेष गाड्या धावतील
पीटीआयच्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने जे सांगितले गेले त्यानुसार, रेल्वे सेवा पूर्ववत झाली तर आणखी एक बाब असू शकते. यादरम्यान, सुरु होणा-या रेल्वे या नियमित स्वरुपाच्या नव्हे तर सर्व
विशेष गाड्या असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत रेल्वे फक्त विशेष गाड्यांसह दोन तृतीयांश प्रवासी सेवा चालवत आहे.
विशेष गाड्यांमध्ये काही खास श्रेणी वगळता कोणतीही सवलत दिली जात नाही
रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्यासाठी नियमित ट्रेनपेक्षा थोडे जास्त शुल्क आकारले जाते. तसेच, विशिष्ट श्रेणी वगळता कोणतीही सवलत दिली जात नाही. याशिवाय पूर्णपणे राखीव गाड्या चालवल्या जातात. गेल्या वर्षी मार्चमध्ये जेव्हा कोविडमुळे लॉकडाऊन झाले तेव्हापासून सर्व नियमित प्रवासी गाड्या धावणे बंद आहेत. विशेष रेल्वे सेवा मेपासून सुरू झाली आहे.
राज्यांची मंजुरी आणि कोविडच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल
कोविडच्या पुर्वीच्या तुलनेत सध्या 77% एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांच्या व्यतिरिक्त केवळ 20% प्रवासी गाड्या धावत आहेत. या व्यतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवेच्या 91% गाड्या सुरू आहेत. पीटीआयने रेल्वेच्या अधिका-याचा हवाला देत म्हटले आहे की, रेल्वे येत्या दोन महिन्यांत विशेष गाड्यांद्वारे कोविडपूर्व स्तरावर आपली सेवा आणू शकेल. मात्र ते राज्यांच्या मंजुरी आणि कोविड -19 च्या स्थितीवर अवलंबून असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
कोविड पूर्वी 1,768 एक्स्प्रेस / मेल गाड्या धावायच्या, आता 1,353 ट्रेन आहेत
कोविड पूर्वी, दररोज 1,768 एक्स्प्रेस आणि मेल गाड्या धावत असत, अशा प्रकारच्या आता केवळ 1,353 गाड्या धावत आहेत. याशिवाय रोज 3,634 प्रवासी गाड्या धावायच्या, ज्याची संख्या खाली येऊन 740 झाली आहे. उपनगरीय रेल्वेबद्दल सांगायचे म्हणजे दररोज 5,881 लोकल ट्रेन धावत होत्या. त्यापैकी सध्या 5,381 ट्रेन सध्या सुरु आहेत.
24 तासांत कोविडचे अॅक्टिव केस 30,641 ने वाढून 6,14,696 वर गेले आहेत
रेल्वे सेवा पुर्वपदावर येणार की नाही हे सर्वस्वी कोविडच्या स्थितीवर अवलंबुन असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, कोविडच्या अॅक्टिव केस गेल्या 24 तासांत 30,641 ने वाढून 6,14,696 वर पोहोचल्या आहेत, तर मृतांची संख्या 469 वाढून 1,63,396 वर गेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.