आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Amazon Slash 18,000 Jobs Cuts; Amazon Employee Layoff Latest Update | Amazon Job Cuts

अ‌ॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांना काढणार:आर्थिक मंदीच्या भीतीने निर्णय; प्रभावित कर्मचाऱ्यांना सेपरेशन पेमेंट, विमा मिळणार

वॉशिंग्टन ​​​​​​​एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अ‌ॅमेझॉन 18 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. गेल्या काही वर्षात अ‌ॅमेझॉनने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र, आता आर्थिक मंदीच्या भीतीने कर्मचारी कमी केले जात आहेत. या कर्मचारी कपातीमुळे अनेक विभागाला फटका बसणार आहे. यामध्ये Amazon Store आणि People, Experience and Technology (PXT) टीममधील बहुतांश कर्मचाऱ्यांना काढले जाणार आहे.

नोव्हेंबर-2022 मध्ये 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी केले

याआधी म्हणजे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 10,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. सप्टेंबरच्या अखेरीस अ‌ॅमेझॉनचे 1.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी होते. ज्यामुळे ते सर्वात मोठ्या युएस नियोक्यांपैकी एक बनले आहे. अ‌ॅमेझॉनच्या या निर्णयानंतर त्याच्या शेअर्समध्ये 2% वाढ झाली. या निर्णयामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होईल, असे गुंतवणूकदारांना वाटते.

सेपरेशन पेमेंट, इन्शुरन्स मिळेल
अ‌ॅमेझॉन​​​​​​​चे सीईओ अँडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्यांना सेपरेशन पेमेंट, ट्रान्सिशनल हेल्थ इन्शुरन्स बेनिफिट्स आणि एक्सटर्नल जॉब प्लेसमेंट सपोर्ट देत आहोत. ते म्हणाले, आर्थिक संकटामुळे प्रभावित झालेल्यांच्या योगदानाबद्दल मी खूप आभारी आहे. जे लोक आमच्यासोबत पुढचा प्रवास चालू ठेवतील त्यांच्यासोबत, ग्राहकांचे जीवन दररोज अधिक चांगले आणि सोपे करण्यासाठी मी त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे.

एका कर्मचाऱ्याने दिली माहिती
ते म्हणाले, 'आम्ही सहसा अशा प्रकारचा संवाद बाधित लोकांशी बोलल्यानंतरच करतो. परंतु आमच्या भागीदारांपैकी एकाने ही माहिती बाहेरून लीक केली आहे, म्हणून आम्ही ठरवले की ही माहिती प्रथम सामायिक करणे चांगले होईल. आम्हाला 18 जानेवारीपासून पीडित कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा आहे.

कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले
अलीकडे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीने आपल्या काही गैरफायदा असलेल्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले आहे. याचे कारण असे की कंपनीचे अनेक प्रकल्प लवकरच बंद होणार आहेत. तशी तयारी कंपनी करित आहे.

नोकरी-गुंतवणुकीत समतोल साधायचा

कंपनीने याआधीच नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका नोटमध्ये म्हटले आहे की, आम्ही एका असामान्य आर्थिक संकटाचा सामना करित आहोत. यात आम्ही आमची जागा आणि गुंतवणूक संतुलित करण्याचा निर्णय करतोय. ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा आव्हानात्मक अर्थव्यवस्थांचा सामना करावा लागत आहे.

माणसांची जागा घेत आहे रोबोट
कंपनी अनेक युनिट्समध्ये काम करण्यासाठी रोबोटच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. सद्या डिलिव्हरी केलेल्या पॅकेटपैकी सुमारे 3 चतुर्थांश पॅकेट कोणत्या ना कोणत्या रोबोटिक प्रणालीतून जातात. अ‌ॅमेझॉन रोबोटिक्सचे प्रमुख टाय ब्रॅडी म्हणाले होते की, पुढील 5 वर्षांत पॅकेजिंग 100% रोबोटिक प्रणालीने केली जाणार आहे. त्यांनी सूचित केले की, भविष्यात रोबोट मानवी कर्मचार्‍यांची जागा घेतील. परंतू त्यासाठी बराच वेळ लागेल.

बातम्या आणखी आहेत...