आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI ने Amazon Pay ला 3.06 कोटी रुपये दंड ठोठावला:KYC नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी Amazon Pay (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला 3.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. केवायसीशी संबंधित सूचना कंपनी पाळत नव्हती. पेमेंट अँड सिस्टम सेटलमेंट ऍक्ट, 2007 च्या कलम 30 अंतर्गत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत आरबीआयने नोटीस जारी केली होती. त्यामध्ये सूचनांचे पालन न केल्यास दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती. कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर आरबीआयने आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

UPI मार्केटमध्ये Amazon चा वाटा खूपच कमी
अमेझॉनकडे भारतात ई-कॉमर्ससह UPI सेवा देखील आहे. मात्र, UPI मार्केटमध्ये त्याचा वाटा खूपच कमी आहे. भारतातील UPI मार्केटमध्ये PhonePe चा सर्वाधिक 49% मार्केट शेअर आहे. PhonePe नंतर 34% शेअरसह Google Pay, 11% शेअरसह Paytm, 1.8% शेअरसह क्रेडिट पे आहे. WhatsApp, Amazon Pay आणि बँकिंग अॅप्सचा वाटा 3.5% आहे.

UPI लाँच झाल्यापासून क्रांती
2016 मध्ये UPI लाँच झाल्यानंतर, डिजिटल पेमेंटच्या जगात एक क्रांती झाली. UPI ने थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. पूर्वी डिजिटल वॉलेटचा ट्रेंड होता. वॉलेटमध्ये केवायसी सारखा त्रास होतो. तर यूपीआयमध्ये काहीही करावे लागत नाही.

UPI ला NCPI ऑपरेट करते
भारतातील RTGS आणि NEFT पेमेंट सिस्टीमचे कार्य आरबीआयकडे आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणाली चालवते. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून UPI ​​व्यवहारांसाठी शून्य-शुल्क फ्रेमवर्क अनिवार्य केले आहे.

नेपाळमध्ये भारताच्या यूपीआयचा प्रवेश

नेपाळमध्ये भारताच्या युपीआयला अखेर हिरवा झेंडा मिळाला आहे. त्यामुळे आता नेपाळमध्ये देखील भारताची युपीआय प्रणाली वापरली जाणार आहे. UPI प्रणालीचा अवलंब करणारा भारताव्यतिरिक्त नेपाळ हा पहिलाच देश ठरला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...