• Home
  • Business
  • Amazon will also provide 50,000 seasonal jobs to completing demand

नोकरी / मागणी पूर्ण करण्यासाठी अॅमेझॉनही देणार 50 हजार हंगामी नोकऱ्या

  • हंगामी कर्मचारी सामग्री आणणे, पॅक करणे, पुढे पाेहोचवणे आणि डिलिव्हरीच्या कामास येतील

वृत्तसंस्था

May 23,2020 09:10:00 AM IST

नवी दिल्ली. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतात ५०,००० जणांना रोजगाराची तात्पुरती संधी देईल. टाळेबंदीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होणे हे त्यामागचे कारण आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित ठिकाणी सर्व सामग्रींना ऑनलाइन डिलिव्हरीची परवानगी दिली आहे, अशा वेळी अॅमेझॉनने ही घोषणा केली आहे. अॅमेझॉननुसार, कंपनी सध्याच्या पुरवठा साखळी कर्मचाऱ्यासह या लोकांना काम करण्याची संधी देईल. हे ५०,००० हंगामी कर्मचारी सामान आणणे, पॅक करणे, सामान पुढे नेणे आणि सामग्री ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याशी संबंधित ही कामे असतील. या नोकऱ्या अॅमेझॉन फ्लेक्स सर्व्हिसअंतर्गत काढल्या आहेत.

इंडियाबुल्सनेे २,००० जणांना राजीनामा देण्यास सांगितले

वित्तीय सेवा समूह इंडियाबुल्स ग्रुपने आपल्या जवळपास २ हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. मात्र, समूहाने सांगितले की, ही कपातीची कारवाई नाही, उलट वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांद्वारे कंपनी सोडण्याच्या चक्राचा म्हणजे एट्रिशनचा भाग आहे. इंडियाबुल्स ग्रुपने सांगितले की, कंपनीमध्ये सामान्यपणे एप्रिल-मेदरम्यान १०-१५ टक्के मनुष्यबळाला एट्रिशन पाहायला मिळते. या वर्षी आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि गृह मंत्रालयाद्वारे स्थिती स्पष्ट करण्याची प्रतीक्षा आहे.

X