आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहवाल:2026 मध्ये जगातील पहिले ट्रिलिनियर होणार अॅमेझाॅनचे जेफ बेजाेस, सध्या 10 लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश अंबानी 2033 मध्ये हाेणार ट्रिलिनियर

अॅमेझाॅनचे संस्थापक जेफ बेजाेस ६ वर्षांनंतर जगातील पहिले ट्रिलिनियर बनणार आहेत. याचा अर्थ एक लाख काेटी डाॅलरपेक्षा (अंदाजे ७५ लाख काेटी रुपये) जास्त संपत्तीचे मालक हाेतील. ही किमया ते २०२६ मध्ये करणार असल्याचा दावा कम्पॅरिझन या सल्लागार कंपनीने केलेल्या एका अभ्यास अहवालात व्यक्त केला आहे. हे यश साध्य करतील तेव्हा बेजाेस यांचे वय ६२ वर्षे असेल. जेफ बेजाेस सध्या १० लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त (१४,३०० काेटी डाॅलर) संपत्तीचे मालक असून त्यांचे वय ५६ वर्षे आहे.

न्यूयाॅर्क स्टाॅक एक्स्चेंजमध्ये नाेंदणीकृत असलेल्या माेस्ट व्हॅल्यूड कंपन्या आणि फाेर्ब्सच्या यादीत सहभागी असलेल्या २५ सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या अभ्यासाच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशाेधनामध्ये या कंपन्या आणि व्यक्तींच्या गेल्या पाच वर्षांत नाेंद केलेल्या सरासरी वृद्धीच्या आधारावर हा भविष्यातील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार जेफ बेजाेस यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांत सरासरी ३४ टक्के वाढ झाली आहे.

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जागतिक पातळीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा सर्वात जास्त फायदा अॅमेझाॅनला झाला आहे. हाेम डिलिव्हरीमध्ये सर्वात जास्त झाली आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीत अॅमेझाॅनने विक्रमी ५.७० लाख काेटी रुपयांची (७५ अब्ज डाॅलर) विक्री केली आहे. ही गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील ४.५५ लाख काेटी रुपयांपेक्षा (६० अब्ज डाॅलर) जास्त आहे. काेराेना व्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात लाॅकडाऊन कायम असल्याने अॅमेझाॅनचा महसूल २१.३३ लाख काेटी रुपये (२८१ अब्ज डाॅलर) झाला हाेता.

मुकेश अंबानी २०३३ मध्ये हाेणार ट्रिलिनियर

अभ्यास अहवालानुसार चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक शु जियायिन २०२७ मध्ये जगातील दुसरे ट्रिलेनिअर बनतील. वयाच्या ६८ व्या वर्षी ते हे साध्य करतील. या अभ्यासानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी २०२३ मध्ये ट्रिलिनियर बनतील. जगातील ते पाचवे ट्रिलिनियर असतील. अंबानी ट्रिलिनियर बनतील त्यावेळी त्यांचे वय ७५ वर्षे असेल. चीनची कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा २०३०मध्ये जगातील तिसरे ट्रिलिनियर बनतील. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग जवळपास एक दशकानंतर म्हणजे ५१ व्या वर्षी ट्रिलिनियर बनतील.

बातम्या आणखी आहेत...