आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाई:अंबानी, अदानींनी वाढवली गुंतवणूकदारांची संपत्ती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना कमाई करून देण्यात रिलायंस इंडस्ट्रीज आणि अदाणी ग्रुप सर्वात पुढे राहिले. मोतीलाल ओसवाल फायानान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, २०१७ ते २०२२ दरम्यान वेल्थ क्रिएटर म्हणून रिलायंस इंडस्ट्रीज सर्वात वर राहिली. याचदरम्यान देशेतील टॉप-१०० लिस्टेड कंपन्यांनी ९२.२ लाख कोटी रुपयांची कमाई केली. यातील १३.०२ लाख कोटी रुपये एकट्या रिलायन्सने कमवून दिले. परताव्याची वार्षिक सरासरी ३२% होती. सर्वात वेगवान परतावा देण्यात अदानी ट्रांसमिशन टॉपवर राली. या कंपनीने वार्षिक १०६% परतावा दिला. सातत्याने चांगला पतवा देण्याच्या बाबतीत अदानी एंटरप्रायझेस अव्वलस्थानी होती. गेल्या ५ वर्षांत या कंपनीने ९७% दराने परतावा दिला.

पाच वर्षांत रिलायन्सने कमावले १३ लाख कोटी कंपनी संपत्ती कमावली रिलायन्स इंड. 13.02 टीसीएस 09.54 इन्फोसिस 05.79 एचडीएफसी बँक 04.10 बजाज फायनान्स 03.61 (रक्कम लाख कोटी रुपयांत)

अदानी ट्रान्समिशनने दिला सर्वात वेगवान परतावा कंपनी रिटर्न % अदानी ट्रांसमिशन 106 तानला प्लॅटफॉर्म्स 100 अदानी एंटरप्रायझेस 97 ब्राइटकॉम ग्रुप 92 टाटा टेली. (महाराष्ट्र) 87

अदानी एंटरप्रायझेसने दिला सातत्यपूर्ण परतावा कंपनी रिटर्न % अदानी एंटरप्रायझेस 97 एल्किल अमीन्स 74 कोफोर्ज 59 माइंडट्री 57 एल अँड टी इन्फो 54

बातम्या आणखी आहेत...