आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • After Adani, Ambani Became The Richest Businessman In Asia And The 8th Richest Businessman In The World

अंबानींनी पुन्हा अदानींना टाकले मागे:अदानी यांना मागे टाकत अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, जगात 8 व्या क्रमांकावर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गेल्या दोन दिवसांत RIL च्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे अंबानींची एकूण संपत्ती 99.7 अब्ज डॉलर (सुमारे 7.73 लाख कोटी रुपये) झाली आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 98.7 अब्ज डॉलर (7.66 लाख कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीतही मुकेश अंबानींनी मागे टाकले आहे.

जगात अंबानी 8व्या तर अदानी 9व्या क्रमांकावर

ब्लूमबर्गच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 8व्या तर गौतम अदानी 9व्या क्रमांकावर आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 227 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 17.6 लाख कोटी रुपये आहे. Amazon चे मालक जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 149 अब्ज डॉलर (सुमारे 11.5 लाख कोटी रुपये) आहे. तिसऱ्या क्रमांकावर 138 अब्ज डॉलर (10.71 लाख कोटी रुपये) असलेले फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट आहेत. ते LVMH चे अध्यक्ष आहेत. LVMH ही जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू बनवणारी कंपनी आहे.

फोर्ब्सच्या यादीत अंबानी सहाव्या क्रमांकावर

104.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आहेत. 100.3 अब्ज डॉलरसह गौतम अदानी 9व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या मते, एलन मस्क यांची एकूण संपत्ती 233.7 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 158 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जेफ बोगेस तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 151.2 अब्ज डॉलरची आहे.

बातम्या आणखी आहेत...