आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील बँकिंग संकट थांबता थांबेना:SVB आणि सिग्नेचर बॅंकेनंतर फर्स्ट रिपब्लिक बँकही अडचणीत, गत 5 दिवसांत 65.61% शेअर्स तुटले

वॉशिंग्टन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ट्रेडिंग दिवशी बॅंकेच्या शेअर्सची किंमत 19 डॉलरच्या निचांकी पातळीवर पोहोचली होती. अशा स्थितीत गुंतवणूकदारांमध्ये या बँकेची चिंता वाढली आहे.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील संकट थांबण्याचे नाव काही घेईना. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक नंतर आता फर्स्ट रिपब्लिक बँक देखील बंद होण्याच्या धोका आहे. गेल्या 5 दिवसात फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरमध्ये 65.61% ची घसरण झाली आहे.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात, फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या स्टॉकची किंमत 74.25% नी घसरली आहे. मागील ट्रेडिंग दिवशी त्याची किंमत प्रति शेअर $19 च्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. अशा स्थितीत गुंतवणूकदारांमध्ये या बँकेची चिंता वाढली आहे.

मूडीजने फर्स्ट रिपब्लिक बँकेला अंडर रिव्ह्यूजमध्ये ठेवले
रेटिंग एजन्सी मूडीजच्या वतीने, पुनरावलोकनाखाली ठेवलेल्या सहा अमेरिकन बँकांमध्ये फर्स्ट रिपब्लिक बँकेचे नाव देखील समाविष्ट केले आहे. याशिवाय, रेटिंग एजन्सीने Zions Bancorp, Western Aliens Bancorp, Comerica Inc, UMB Financial Corp आणि Intrust Financial Corporation यांचे रेटिंग देखील कमी केले आहे. त्यांना अंडर रिव्ह्यूजमध्ये ठेवले आहे. याआधी सोमवारी, मूडीजने सिग्नेचर बँकेचे कर्ज रेटिंग जंक टेरिटरीमध्ये खाली आणले.

बँक म्हणाली - आमच्याकडे व्यवहारांसाठी पुरेसा निधी आहे
फर्स्ट रिपब्लिक बँकेने आपल्या बचावात म्हटले की, आमच्याकडे बँक चालवण्यासाठी पुरेशी रोकड आहे. त्यांनी अतिरिक्त रोकडसाठी फेड आणि जेपी मॉर्गनशी हातमिळवनी केली आहे. यापूर्वी सोमवारी, वेस्टर्न अलायन्सच्या वतीने सांगण्यात आले की, बँकेकडे 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रोकड उपलब्ध आहे.

हे ही वाचा

सिलिकॉन व्हॅली बॅंकेच्या प्रश्नावर बायडेन यांचे मौन:पत्रकारपरिषदेतून थेट निघून गेले, व्हिडिओ व्हायरल

सिलिकॉन व्हॅली बँकेचे संकट अमेरिकन सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सोमवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचा व्हिडिओ पाहता सरकारकडे या संकटाला सामोरे जाण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचे दिसते. सोमवारी सिलिकॉन व्हॅली बँक संकटावर बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये बायडेन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता परिषदेमधून निघून गेले. - येथे वाचा संपूर्ण बातमी

सिलिकॉन व्हॅलीनंतर US ची सिग्नेचर बँक देखील बंद:बॅंकिंग संकटांचा सामना करण्यासाठी आज तातडीची बैठक

सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) नंतर आता सिग्नेचर बँकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सिग्नेचर बँकेकडे क्रिप्टोकरन्सीचा साठा होता. त्याचा धोका लक्षात घेऊन काही काळ बँक बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी या बँकेच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली होती. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...