आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री शक्य:मायक्रोसॉफ्ट या चिनी अॅपचा जागतिक व्यवसाय खरेदी करू शकते, मात्र 15 सप्टेंबरपूर्वी व्यवहार पूर्ण करावा लागेल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने टिकटॉकवर घातली बंदी, 45 दिवसांनंतर लागू होईल प्रतिबंध
  • बाईटडान्स आणि मायक्रोसॉफ्टमध्ये दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे

चीनचे लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकची पुन्हा भारतात एंट्री होऊ शकते. कारण अमेरिकेची दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा ग्लोबल बिझनेस खरेदी करण्याचा विचार करत आहे. यात भारत आणि युरोपमधील व्यवसायाचा समावेश असू शकतो. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दावा केला गेला आहे.

मायक्रोसॉफ्टची बाईटडान्ससोबत चर्चा सुरू आहे

टिकटॉकच्या खरेदीबाबत मायक्रोसॉफ्ट याची पॅरेंट कंपनी बाइटडान्ससोबत चर्चा करत आहे. दरम्यान या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने रॉयटर्सने म्हटले की, मायक्रोसॉफ्टने संपूर्ण टिकटॉक खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला नाही. रॉयटर्सनुसार, मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील व्यवसाय खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहे.

अद्याप कराराची किंमत उघडकीस आलेली नाही. बाईटडन्स कार्यकारी तिकिटकॉकचे मूल्य 50 अब्जपेक्षा जास्त सांगत आहेत.

अमेरिकेने टिकटॉकवर घातली बंदी

भारतानंतर अमेरिकेने चायनीज अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सवरील बंदीच्या आदेशावर गुरुवारी स्वाक्षरी केली. यानुसार 45 दिवसांनंतर ही बंदी लागू होईल. टिकटॉकसोबत चायनीज अॅप वीचॅटवर देखील बंदी घातली आहे.

15 सप्टेंबरपूर्वी करावा लागेल करार

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांची भेट घेत टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय खरेदी करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटीची माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि बाईटडान्सला टिकटॉकच्या अमेरिकेतील व्यवसायाबाबत 15 सप्टेंबरपूर्वी करार करावा लागणार आहे. जर 15 सप्टेंबरपर्यंत दोन्ही कंपन्या कोणत्याही करारात अपयशी ठरल्या तर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यात येईल.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने स्पष्टपणे सांगितले नाही की जर हा करार होईल तर वापरकर्त्याच्या डेटाच्या सुरक्षेसाठी काय करेल? अमेरिकेत टिकटॉकचे सद्या सुमारे 30 मिलियन अॅक्टीव्ह युझर्स आहेत. यावर्षी अमेरिकेत टिकटॉकची जॉब ग्रोथ तीन पटीने जास्त राहिलील. जानेवारीत 500 च्या तुलनेत अमेरिकेत आता टिकटॉकचे 1400 कर्मचारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...