आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या येस बँकेच्या धर्तीवर अमेरिकेच्या फर्स्ट रिपब्लिकला वाचवण्यासाठी अमेरिकेच्या 11 मोठ्या बँकांनी पुढाकार घेतला आहे. या बँका फर्स्ट रिपब्लिकमध्ये सुमारे 30 अब्ज डॉलर्सची (जवळपास 2.5 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना पैसे काढण्यास अडचण येणार नाही याची काळजी घेतील. या 11 बँकांत जे पी मॉर्गन, सिटी ग्रुप, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो, मॉर्गन स्टेनली, US बँकॉर्प, ट्रुइस्ट फायनांशिअल, PNC फायनांशिअलचा समावेश आहे.
जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप व वेल्स फार्गो प्रत्येकी 5 अब्ज डॉलर्स टाकतील. तर गोल्डमन सॅक्स व मॉर्गन स्टॅनले 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील. उर्वरित बँकाही अल्प प्रमाणात भांडवल गुंतवतील. यापूर्वी रविवारी, फर्स्ट बँकेने एका निवेदनाद्वारे जेपी मॉर्गन व फेडरल रिझर्व्हकडून 70 अब्ज डॉलर्सच्या निधीचा एक्सेस मिळाल्याचे स्पष्ट केले होते.
यापूर्वी भारताच्या येस बँकेला वाचवण्यासाठी 8 बँका अशाच पुढे सरसावल्या होत्या. पुनर्रचना योजना सुरू झाल्यापासून येस बँकेच्या आर्थिक कामगिरीत हळूहळू सुधारणा होत आहे. खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपुढे त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या 75 टक्के रक्कम बँकेत लॉक इन कालावधीसाठी ठेवण्याची अट ठेवण्यात आली आहे.
बँकांचा विश्वास दर्शवणारे पाऊल
भांडवल टाकणाऱ्या अमेरिकन बँकांनी म्हटले आहे की, 'हा निर्णय फर्स्ट रिपब्लिक व सर्वच साइज बँकांवरील त्यांचा विश्वास दर्शवणारा आहे. दुसरीकडे, अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन, फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे चेअरमन जेरोम पॉवेल व फेडरल डिपॉझिट इंश्योरंसचे चेअरमन मार्टिन ग्रुनबर्ग यांनी बँकांचे हे पाऊल स्वागतारार्ह असून, यातून आपल्या बँकिंग व्यवस्थेची लवचिकता दिसून येते, असे स्पष्ट केले आहे.
फर्स्ट रिपब्लिकच्या शेअर्समध्ये सुधारणा
6 मार्चपासून फर्स्ट रिपब्लिकच्या शेअर्समध्ये वेगाने घसरण दिसून येत होती. बँकेचे शेअर्स जवळपास 70% कोसळले. 6 मार्च रोजी त्याचा शेअर 122 डॉलर प्रति डॉलरवर बंद झाला होता. त्यानंतर 8 मार्च रोजी तो 115 डॉलरवर घसरला. 16 मार्च रोजी तो एकेक्षणी 20 डॉलर्सच्या खाली आला. पण त्यानंतर बँकांच्या मदतीच्या बातमीमुळे तो जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 34.27 डॉलरवर बंद झाला.
अमेरिकन बँकिंग संकटाचा भारतीय बँकांना फटका नाही
अमेरिकेच्या बँकिंग संकटाचा भारतीय बँकांवर परिणाम होणार नाही. अमेरिकन गुंतवणूक कंपनी जेफरीज व वित्तीय सेवा फर्म मॅक्वेरी यांनी म्हटले आहे की, स्थानिक ठेवींवर अवलंबून राहणे, सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक व पुरेशी तरलता यामुळे भारतीय बँका मजबूत स्थितीत आहेत.
भारताच्या येस बँकेला वाचवण्यासाठी 8 बँका सरसावल्या
येस बँक वाचवण्यासाठी एसबीआयच्या नेतृत्वातील 8 वित्तीय संस्थांनी बँकेत 10,000 कोटी रुपये ओतले होते. हे पैसे 13 मार्च 2020 रोजी बचाव योजनेंतर्गत ओतण्यात आले. या गुंतवणूकदारांना 10 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्सचे वाटप करण्यात आले. SBI ने सुरुवातीला येस बँकेत 49% स्टेक घेण्यासाठी 6,050 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.