आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेसबुकनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेकला आपला ‘जिओ फ्रेंड’ बनवले आहे. सिल्व्हर लेक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५.६५५.७५ काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीला जिआेतील जवळपास १.१५ % भागभांडवल मिळेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व त्यांची सहायक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड यांनी सोमवारी या कराराची घोषणा केली. या गुंतवणुकीत जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य अंदाजे ४.९० लाख कोटी रुपये आहे. हे फेसबुकच्या मूल्यापेक्षा १२.५ % जास्त आहे. गेल्या दोन आठवड्यांत जिओमधील ही दुसरी मोठी परकीय गुंतवणूक आहे. २२ एप्रिल रोजी सोशल मीडियातील अग्रणी कंपनी फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली हाेती. यानंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकचा ९.९९ % भांडवली वाटा आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक होती.रिलायन्सने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एक लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये फेसबुक, साैदी अरामकाे आणि बीपी यांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. आता त्यात सिल्व्हर लेकच्या गुंतवणुकीची भर पडली आहे. रिलायन्सने ५३,१२५ काेटी रु. हक्कभाग आणण्याचीही घाेषणा केली आहे.
भारतीय डिजिटल सोसायटीतील बदलासाठी सिल्व्हर लेकच्या जागतिक संबंधाचा लाभ
सिल्व्हर लेकचे एक महत्त्वाचा भागीदार म्हणून स्वागत करतो. सिल्व्हर लेककडे आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांबराेबरचा भागीदारीचा चांगला अनुभव आहे. भारतीय डिजिटल समाजात परिवर्तन घडवण्यासाठी सिल्व्हर लेकच्या जागतिक संपर्काचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहाेत. - मुकेश अंबानी, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
रिलायन्स आणि जिओच्या टीमसोबत भागीदारीने सन्मानित झाल्यासारखे वाटते
‘जिओ प्लॅटफॉर्म’ जगातील सर्वात लक्षणीय कंपन्यांपैकी एक असून त्याचे नेतृत्व एक भक्कम आणि उद्योगशील व्यवस्थापन टीम करत आहे. जिआेच्या माेहिमेला गती देण्यासाठी मुकेश अंबानी, रिलायन्स आणि जिआेच्या टीमबराेबर सहकार्य करताना आम्हाला आनंद हाेत आहे. - एगॉन डरबन, सह-सीईआे आणि व्यवस्थापकीय भागीदार, सिल्व्हर लेक
जिआे प्लॅटफार्म
२०१६ मध्ये सार्वजनिक काम सुरू करणारी जिआे भारतातील हायस्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कबराेबरच डिजिटल अॅप, डिजिटल इकाे-सिस्टिममध्ये काम करणारी पुढच्या पिढीतील तंत्रज्ञान कंपनी आहे. जिआे इन्फाेकाॅम नेटवर्कवर ३८ काेटी ८० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.
सिल्व्हर लेक
१९९९मध्ये स्थापन झालेली ही जगातील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी जगात ३३ लाख काेटी रु. जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करते. कंपनीने एअरबीएनबी, अलिबाबा, अँट फायनान्शियल, ट्विटर, डेल,अल्फाबेटची व्हॅरिले व व्हेमाेसारख्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
कर्जफेडीसाठी जिआेचा भांडवल हिस्सा विक्रीचा रिलायन्सचा विचार
गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मार्च २०२१ पर्यंत कंपनीला कर्जमुक्त करण्याची घाेषणा केली हाेती. कंपनी हिश्श्याची विक्री करत आहे. रिलायन्सने ३० एप्रिल राेजी चाैथ्या तिमाही आर्थिक निकालांच्या घाेेषणेच्या अगाेदर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जिआे प्लॅटफाॅर्ममधील आणखी १० टक्के भांडवली हिश्श्याची विक्री करण्याचे संकेत दिले.जागतिक गुंतवणूकदार जिआेेत गुंतवणुकीस स्वारस्य दाखवत असल्याचे रिलायन्सने म्हटले होते. त्यानंतर ५ दिवसांत सिल्व्हर लेकने गुंतवणूक केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.