आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिओनेल मेस्सी बनला बायजूचा ब्रँड अँबेसॅडर:कर्मचारी कपातीनंतर कंपनीचे मेस्सीसोबत कोलॅबोरेशन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एडटेक कंपनी बायजूने शुक्रवारी प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला आपली सोशल इम्पॅक्ट आर्म-एज्युकेशन फॉर ऑलचा ब्रँड अँबेसॅडर म्हणून नियुक्तीची घोषणा केली. बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी म्हटले की, 'आम्ही आमचे ग्लोबल अँबेसॅडर म्हणून लिओनेल मेस्सींसोबत कोलॅबोरेट करण्यासाठी उत्साहित आहोत. ते वन इन अ जनरेशन टॅलेन्ट आहेत. मेहनतीच्या जोरावर ते आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक बनले आहेत.'

कंपनीने हा खुलासा केला नाही की, मेस्सीला ब्रँड अँबेसॅडर बनवण्यासाठी त्यांनी किती पैसे खर्च केले. ही पहिली वेळ नाही, जेव्हा बायजूने प्रसिद्धी आणि ब्रँड अँबेसॅडरविषयी मोठे पाऊल उचलले आहे. 2017 मध्ये त्यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला आपले ब्रँड अँबेसॅडर बनवले होते. 2019 मध्ये कंपनी भारतीय क्रिकेट संघाची प्रमुख स्पॉन्सर बनली होती. त्यांचा 2017-2022 पर्यंतचा करार 1,079 कोटी रुपयांचा होता.

बायलॅटरल मॅचसाठी 4.61 कोटी देते बायजू

कंपनी प्रत्येक बायलॅटरल सामन्यासाठी 4.61 कोटी आणि आयसीसी इव्हेन्टमध्ये प्रत्येक सामन्यासाठी 1.51 कोटींचे पेमेन्ट करते. अलिकडेच बायजूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा करार 454 कोटी रुपयांमध्ये रिन्यू केला आहे. रेग्युलेटरी फायलिंगनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये जाहिरात आणि प्रसिद्धीवर 2500 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.

2500 कर्मचाऱ्यांना काढले

महत्वाचे म्हणजे बायजूने हा करार अशा वेळी केला आहे जेव्हा नफा वाढवण्यासाठी आणि कॉस्ट कंट्रोलसाठी कंपनीने 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही संख्या त्यांच्या एकूण 50,000 कर्मचाऱ्यांच्या 5% इतकी आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2021 मध्ये 4589 कोटींचा तोटा झाला आहे. जो कोणत्याही भारतीय स्टार्टअपचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा आहे.

बातम्या आणखी आहेत...