आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमूल दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ:सर्वसामान्याना फटका; 17 ऑगस्टपासून नवीन दर लागू होणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील सर्वात मोठी दुग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारी कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. 17 ऑगस्टपासून 500 मिली अमूल गोल्डची किंमत 31 रुपये, अमूल ताजा 500 मिली दूध 25 रुपये आणि 500 ​​मिली अमूल शक्ती दुधाची किंमत 28 रुपये प्रति पॅकेट असणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केल्यानंतर कमाल विक्री किंमत 4 टक्क्याने वाढली आहे.

गेल्याच महिन्यात अमूल, गोवर्धन सोनाई यांसह सर्वच दूध कंपन्यांनी दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केलेली होती. परंतू महिनाभरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे.

इंधनापाठोपाठ दूधाचे दर वाढू लागले

सर्वसामान्यांना गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल सह किराणा सामानातील वस्तूंच्या किमती अतिशय झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले जात आहे. त्यातच आता पुन्हा दूधाच्या किमतीत वाढ झाल्याने महिन्याच्या बजेटचे नियोजन करायचे कसे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मार्चमध्ये भाव वाढले
1 मार्च रोजी अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. सध्या, अमूल गोल्ड दूध 30 रुपये प्रति 500 ​​मिली, अमूल ताजा 24 रुपये प्रति 500 ​​मिली आणि अमूल शक्ती 27 रुपये प्रति 500 ​​मिली दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर उद्यापासून लिटरमागे दोन रुपये महागणार आहेत. 2 रुपये प्रति लिटर वाढ MRP मध्ये 4 टक्के वाढीइतकी आहे. मदर डेअरी बुधवारपासून फुल क्रीम दुधाची किंमत 59 रुपये प्रति लिटरवरून 61 रुपये प्रति लिटर करणार आहे. टोन्ड दुधाची किंमत 51 रुपये आणि दुप्पट दुधाची किंमत 45 रुपये प्रतिलिटर होईल. गायीच्या दुधाचा दर 53 रुपये प्रतिलिटर झालेला आहे.

पशुखाद्य महागल्याने दरात वाढ
ऑपरेशन कॉस्ट आणि दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे किमतीत वाढ झाल्याचं कारण अमूलने दिलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाली आहे. निविष्ठा खर्च आणि पशुखाद्यातील वाढ पाहता, अमूल फेडरेशनशी संलग्न असलेल्या दूध संघांनीही शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८-९% वाढ केली आहे.

दूध उत्पादकांना एक रुपयापैकी 80 पैसे

त्यांच्या धोरणाअंतर्गत, अमूल ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक रूपये 1 पैकी 80 पैसे दूध उत्पादकांना देते. किमतीत सुधारणा झाल्याने दूध उत्पादकांना मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल. या वाढीमुळे मार्चपासून दुधाचे दर प्रतिलिटर 4 रुपयांनी वाढले आहेत.

मदर डेअरीनेही मार्चमध्ये दरात वाढ केली
मदर डेअरी ही दिल्ली-एनसीआर बाजारपेठेतील प्रमुख दूध पुरवठादारांपैकी एक आहे आणि पॉली पॅक आणि व्हेंडिंग मशीनद्वारे दररोज 3 दशलक्ष लिटरहून अधिक दूध विकते. त्याच वेळी, अमूल हा देशातील अग्रगण्य ब्रँड आहे. ज्याची मालकी लाखो शेतकऱ्यांची आहे. गुजरातच्या दोन गावांमधून 75 वर्षांपूर्वी 247 लिटर दुधापासून सुरू झालेला प्रवास आज 260 लाख लिटरपर्यंत पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...