आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Anand Mahindra Will Give Opportunity To Firefighters In His Group, Said We Are Saddened By The Violence

अग्निवीरांना मिळाली नोकरीची ऑफर:आनंद महिंद्रा त्यांच्या ग्रुपमध्ये देणार अग्निवीरांना संधी, म्हणाले- हिंसाचारामुळे दु:खी झालो

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महिंद्रा यांनी आज सकाळी ट्विट केले की, अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरांनी आत्मसात केलेली शिस्त आणि कौशल्य त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा अग्निवीरांना त्यांच्या कंपनीत संधी देणार आहेत.

अग्निवीरांना कोणते पद दिले जाईल, असा प्रश्न एका व्यक्तीने त्यांच्या ट्विटवर केला. यावर ते म्हणाले की, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांच्या रोजगाराला भरपूर वाव आहे. नेतृत्व, टीमवर्क आणि शारीरिक प्रशिक्षणासह, अग्निवीर उद्योगाला बाजारपेठ तयार करण्यात मदत करतील. यात ऑपरेशन्सपासून प्रशासन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचा समावेश असेल.

अग्निपथ योजनेसाठी राज्यातील अनेक संघटनांचा आज भारत बंद

लष्कराच्या अग्निपथ योजनेला अनेक राज्यांतून विरोध होत आहे. अनेक संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने आरपीएफ आणि जीआरपीला अलर्ट मोडवर ठेवले आहे. यासोबतच गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तरूण चार वर्षे संरक्षण दलात देतील सेवा

केंद्र सरकारने 14 जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दल या लष्कराच्या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी अग्निपथ भरती योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षे संरक्षण दलात सेवा द्यावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

1. ही अग्निपथ योजना आहे काय?

अग्निपथ योजना ही सशस्त्र दलांसाठी देशव्यापी अल्पकालीन तरुण भरती योजना आहे. या योजनेंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाईल. अग्निवीर वाळवंट, पर्वत, जमीन, समुद्र किंवा आकाशात अशा विविध ठिकाणी तैनात केले जातील.

2. अग्निवीरांचा दर्जा काय असेल?

या नव्या योजनेत अधिकारी पदापेक्षा कमी दर्जाच्या सैनिकांची भरती केली जाणार आहे. म्हणजेच त्यांची रँक ऑफिसर रँकच्या खाली असलेले कार्मिक म्हणजेच पीबीओआर असेल. या सैनिकांची रँक आता लष्करातील कमिशन्ड ऑफिसर आणि नॉन-कमिशन्ड ऑफिसर नियुक्तीपेक्षा वेगळी असेल.

3. एका वर्षात अग्निवीरची किती वेळा भरती केली जाईल?

या योजनेंतर्गत वर्षातून दोनदा भरती करण्यात येणार आहे.

4. यावर्षी किती सैनिकांची भरती होणार आहे?

यंदा 46 हजार अग्निवीरांची भरती होणार असली तरी या कालावधीत लष्कराच्या तिन्ही विभागांमध्ये या दर्जाची सैन्य भरती होणार नाही.

5. अग्निवीर होण्यासाठी किती वय आवश्यक आहे?

अग्निवीर होण्यासाठी 17.5 वर्षे ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

6. अग्निवीर होण्यासाठी किती शिक्षण आवश्यक आहे?

अग्निवीर होण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...