आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Anil Ambani Son Wedding Photos | Anmol Ambani Krisha Shah Wedding Video And Latest Photos | Marathi News

अंबानीच्या घरात लग्न:अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल विवाह बंधनात अडकला; कृशा शाहसोबत विवाह संपन्न

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायंस कंपनीचे चेअरमन अनिल धीरूभाई अंबानी यांचा मोठा पुत्र जय अनमोल अंबानी रविवारी (20 फेब्रुवारीला) विवाह बंधनात अडकला. अनमोलने कृशा शाह हिच्यासोबत लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या नवविवाहीत जोडप्याचे फोटो व्हायरल होत आहे.

खासदार जया बच्चन यांनी लग्नात आपली मुलगी श्वेतासोबत हजेरी लावली होती
खासदार जया बच्चन यांनी लग्नात आपली मुलगी श्वेतासोबत हजेरी लावली होती

जय अनमोल आणि कृशाचे विवाह सोहळा अनिल अंबानी यांच्या मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल या निवासस्थानी पार पडला. पाली हिल या परिसरात अनेक सिनेसृष्टीतील कलाकार राहतात. येथे सुनील दत्तांपासून दिलीप कुमार या सर्वांचे घर आहेत.

अनिल अंबानीला दोन मुले आहेत

उद्योजक अनिल अंबानी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव जय अनमोल असून, दुसऱ्या पुत्राचे नाव जय अंशुल असे आहे. जय अनमोलच्या लग्नाची माहिती 31 डिसेंबर 2021 रोजीच टीना अंबानीने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती. त्यात टीनाने कृशा आणि अनमोल या दोघांचे फोटो शेअर करत दोघांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

डावीकडून जय अनमोल, त्याची पत्नी, टीना अंबानी, अनिल अंबानी आणि जय अंशुल.
डावीकडून जय अनमोल, त्याची पत्नी, टीना अंबानी, अनिल अंबानी आणि जय अंशुल.

व्हिडिओ व्हायरल
सध्या जय अनमोल आणि कृशा या नवविवाहीत जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यात अनमोलने ब्राउन रंगाची शेरवानी घातली असून, तो आपल्या कुटुंबाच्या सदस्यासोबत नाचताना दिसत आहे.

डावीकडून अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी त्यांच्या मैत्रिणी आणि सून क्रिशा शाह, मुलगा अनमोल.
डावीकडून अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी त्यांच्या मैत्रिणी आणि सून क्रिशा शाह, मुलगा अनमोल.

अनमोलची गर्लफ्रेंड होती कृशा
अनमोल आणि कृशा या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पार पडला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2022 पासून मेंहदी कार्यक्रमासह प्री-वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. मेहंदीच्या कार्यक्रमात कृशाने मल्टीकलरचा लहेंगा परिधान केला होता.

टीना अंबानी, अनमोल अंबानी, कृशा शाह आणि त्यांची आई
टीना अंबानी, अनमोल अंबानी, कृशा शाह आणि त्यांची आई

मुंबईत कृशा जन्म झाला
कृशा शाहचा जन्म मुंबईत झाला असून, ती एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कृशाचे बालपणीचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यानंतर अमेरिका आणि यूकेतून तिचे उच्च शिक्षण झाले आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून तिने समाजशास्त्र आणि कॅलिफोर्निया येथून राजकीय अर्थशास्त्रचे शिक्षण घेतले आहे. कृशा लव्ह नॉट फियर मोहिमेची वकिली करते. याद्वारे तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली आहे. कृशा तिचा भाऊ मिशाल शाहसोबत डिस्को नावाची कंपनी चालवते. या कंपनीची ती सीईओ आहे.

बातम्या आणखी आहेत...