आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर खरेदीचा करार होल्डवर:मस्क म्हणाले- अगोदर बोगस खात्यांची संख्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट होऊ द्या!

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेण्याबाबतचा करार, आपण होल्डवर ठेवत असल्याची घोषणा एलोन मस्क यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे उद्योग जगतात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. कंपनीचे वापरकर्तांपैकी बोगस खात्यांची संख्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट होत नाही, तो पर्यंत हा करार होल्डवर ठेवण्यात येत असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हे 44 बिलियन डॉलर्समध्ये मस्क यांनी विकत घेतले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर विकत घेण्याचा करार केला होता. हा करार स्पष्ट होण्यापूर्वी एलन मस्क यांनी ट्विट केले आहे की, हा करार काही काळासाठी होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरवर किती स्पॅम किंवा बोगस खाती आहेत याचा अचूक हिशोब तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे हा करार तात्पुरता थांबवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरचा असा विश्वास आहे की बनावट खाती त्याच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 5% आहेत.

अलीकडे, ट्विटरने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की 2022 च्या पहिल्या तिमाहीत त्याच्या कमाई केलेल्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमध्ये (mDAUs) स्पॅम किंवा बोगस खात्यांची संख्या 5% पेक्षा कमी आहे. तथापि, कंपनीने असेही म्हटले आहे की हा केवळ एक अंदाज आहे आणि स्पॅम खात्यांची संख्या जास्त असू शकते. डील होल्डची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरचे शेअर्स प्री-मार्केटमध्ये 20% पेक्षा जास्त घसरले.

अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतात बोगस खाती

ट्विटरने म्हटले आहे की, 'आम्ही खात्याच्या नमुन्याचे अंतर्गत पुनरावलोकन केले आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत बोगस खात्यांची संख्या mDAU च्या 5% पेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. स्पॅम खात्यांचा आमचा अंदाज अशा खात्यांची खरी संख्या अचूकपणे दर्शवत नाही. त्याची संख्या आमच्या अंदाजापेक्षा जास्त असू शकते.

कसा आहे करार
14 एप्रिल रोजी, एलन मस्क यांनी 43 बिलियन डॉलर मध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. मस्क म्हणाले होते, "मी ट्विटरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याच्या आदल्या दिवशी 100% स्टेक 54.20 डॉलर प्रति शेअर दराने 54% प्रीमियमने खरेदी करण्याची ऑफर देत आहे." ही ऑफर माझी सर्वोत्कृष्ट आणि शेवटची ऑफर आहे आणि ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल.

ट्विटरमध्ये मस्क यांची 9.2% हिस्सेदारी आहे. त्याची माहिती ४ एप्रिल रोजी उघड झाली होती. मस्क यांनी सुरुवातीच्या फाइलिंगमध्ये 43 बिलियन डॉलची ऑफर दिली होती मात्र, ट्विटरने सोमवारी कराराला मंजुरी दिल्यानंतर, हा आकडा 44 अब्ज डॉलर झाला. हा आकडा वाढण्याचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

46.5 अब्ज डॉलर उभारण्याची योजना

मस्क यांनी गेल्या आठवड्यात यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला नवीन फाइलिंगमध्ये सांगितले होते की, इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनले आणि इतर सावकारांचा एक गट 13 अब्ज डॉलर कर्ज वित्तपुरवठा करतील तसेच टेस्ला स्टॉकसाठी 12.5 अब्ज डॉलर कर्ज देईल. उर्वरित 21 अब्ज डॉलर इक्विटी फायनान्सिंगमधून येतील. अशा परिस्थितीत मस्क यांनी एकूण 46.5 बिलियन डॉलर जमा करण्याची योजना सादर केलेली होती.

हा करार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. एलन मस्क त्या कंपनीचे मालक असतील. मस्क किंवा ट्विटर पैकी कोणीही त्यांच्या विधानांमध्ये सह-गुंतवणूकदारांचा उल्लेख केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...