आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Another Bank Closure In America; Stock Market Crashes, Gold Rises, Crypto Friendly Signature Bank Gets Slammed

बँकिंग संकट:अमेरिकेमध्ये आणखी एक बँक बंद; शेअर बाजार कोसळले, सोने वधारले, क्रिप्टो फ्रेंडली सिग्नेचर बँकेला लागले टाळे

न्यूयॉर्क/मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे एकाच दिवसात सोने प्रति १० ग्रॅम १,३०० रुपयांनी झाले महाग

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता सिग्नेचर बँकेला टाळे लागले आहे. या बँकेत लोकांचे ७.४ लाख कोटी रुपये (९० अब्ज डॉलर) जमा आहेत. सिग्नेचर बँकेकडे क्रिप्टोकरन्सीचा मोठा स्टॉक असून त्याचे मूल्य एका वर्षात ६०% पेक्षा जास्त घसरले आहे. बँक स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यापूर्वीच अमेरिकन फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स काॅर्पोरेशनने ती आपल्या नियंत्रणात घेतली आहे. सिग्नेचर बँक बंद झाल्याच्या वृत्ताने जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. भारतातही परिणाम दिसला. सेन्सेक्स ८९७ अंकांनी (१.५२%) कोसळला.

सोमवारी सेन्सेक्स ५८,२३७ वर बंद झाला. सेन्सेक्सची ही पातळी ऑक्टोबर २०२२ मध्ये होती.दुसरीकडे जगभरात सोन्याची खरेदी अचानक वाढली आहे. यामुळे सोमवारी भारतातही सोन्याची किंमत १३०० रु. प्रति १० ग्रॅम इतकी वाढली आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६,९६८ रु. प्रति १० ग्रॅम इतका होता.

सिलिकॉन बँकेला टाळे लागल्याचे वृत्त गुरुवारी आले तेव्हापासून कोसळताहेत जगभरातील बाजार
भारत घसरण

सेन्सेक्स -३.५%
निफ्टी -३.४%
अमेरिका
डाऊ जोन्स -२.७%
नास्डॅक -३.८%
एसअँडपी -३.३%
यूरोप
एसटीएसई (यूके) -३.९%
कॅक (फ्रान्स) -३.३%
डॅक्स (जर्मनी) -३.४%
आशिया
हँगसेंग (हाँगकाँग) -१.८%
निक्केई (जपान) -२.१%
कोस्पी (द. कोरिया) -०.९%

एक्स्पर्ट व्ह्यू
भारतावर परिणाम नाही, कारण...

हे अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रासाठी मोठे संकट आहे. मात्र, याचा परिणाम भारतातील बँकिंग क्षेत्रावर होणार नाही. कारण या दोन्ही बँकांचा कस्टमर बेस केवळ अमेरिकेमध्ये आहे. त्यातही बँकेची बहुतांश गुंतवणूक अमेरिकन स्टार्टअप उद्योगामध्ये आहे. त्यामुळे भारतीय बँका अद्यापपर्यंत तरी सुरक्षित आहेत. सिग्नेचर बँकेचे आर्थिक व्यवहारदेखील भारतामध्ये नाहीत.

बातम्या आणखी आहेत...