आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डेना हल व ईशा डेसह डेवोन पेंडलटन
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क बऱ्याच वेळा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मस्क यांच्या ट्वीटमुळे अमेरिकी शेअर बाजारात अनोळखी कंपन्यांचे शेअर्स गगनाला भिडले. मात्र, अनेकदा मस्क यांनी आपल्या ट्वीटद्वारे पायावर कुऱ्हाड मारण्याचे काम केले आहे. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचे कौतुक केले होते. त्या वेळी टेस्लानेही बिटकॉइनमध्ये जवळपास १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. यानंतर बिटकॉइनची किंमत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. मात्र, सोमवारी त्यांनी एका सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहिले की, बिटकॉइन आणि ईथरच्या किमती जास्त आहेत. या ट्वीटमुळे बिटकॉइनची किंमत १७ टक्क्यांपेक्षा जास्त पडली. मात्र, घसरण इथेच थांबली नाही. टेस्लाचे शेअर्सही गडगडले.
या पोस्टमुळे बिटकॉइनच्या किमतीत घसरण झाली. यानंतर टेस्लाचे शेअर्सही ८.६% वर घसरले. मंगळवारीसुद्धा ही घसरण कायम राहिली आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये १३ टक्के घसरण होऊन तो ६१९ डॉलर्सवर आला. दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स २१ टक्के घसरल्याने मस्क यांची संपत्तीत ३५०० कोटी डॉलर्स म्हणजे २.६ लाख कोटींची घट झाली. एसअँडपी -५०० निर्देशांकात टेस्ला सूचिबद्ध झाली त्या वेळच्या दराएवेढी किंमत आता झाली आहे. यामुळेच मस्क यांच्या नावे असलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताबही त्यांनी गमावला आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत क्रमांक एकवर आले आहेत.
मस्क यांच्या संपत्तीत घट झाल्याने जेफ बेजोस बनले सर्वात श्रीमंत
ब्लूमबर्ग निर्देशांकात अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुन्हा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर गेेले आहेत. मस्क आणि बेजोस या दोघांत बऱ्याच काळापासून नंबर वन पदाची चढाओढ सुरू होती. मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गतवर्षात सुमारे ७९४ टक्के वाढ झाली होती. जानेवारीच्या सुरुवातीसही टेस्लाच्या शेअरचे भाव २५ टक्के वधारले होते. त्यामुळेच बेजोस यांना मागे टाकून मस्क यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.