आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Another Resignation From The Twitter | Advertising And Sales Sarah Personett Has Left The Job | Marathi News

Twitter कंपनीतून आणखी एक राजीनामा:आता जाहिरात आणि विक्री विभागाच्या प्रमुख सारा पर्सनेट यांनी सोडली नोकरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनल्यानंतर कंपनीत बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. आता ट्विटरच्या जाहिरात आणि विक्री विभागाच्या प्रमुख सारा पर्सनेट यांनीही कंपनीशी आपले संबंध तोडले आहेत. मंगळवारी सारा यांनी ट्विट केले की, त्यांनी गेल्या आठवड्यातच राजीनामा दिला होता.

सारा यांनी आपल्या राजीनाम्याचे कारणही सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हापासून एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवीन मालक बनले, तेव्हापासून जाहिरातदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. कंपनीत आता काय बदल होऊ शकतात हे त्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे.

एलन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर काही तासातच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि लीगल अफेअर-पॉलिसी हेड विजया गड्डे यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. मस्कच्या या निर्णयानंतर सारानेही कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. सारा ट्विटरवर मुख्य ग्राहक अधिकारी देखील होत्या .

एलन मस्क यांनी 28 ऑक्टोबर रोजी ट्विटरची कमान हाती घेतली. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. एक दिवस अगोदर 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी कंपनीच्या सर्व संचालकांना हटवले होते. यानंतर आता मस्क कंपनीचे एकमेव संचालक बनले आहेत.

बातम्या आणखी आहेत...