आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Antibodies In The Economy; GDP Growth In The First Quarter Was 20.1%, Boosted By The Base Effect

राष्ट्र विनिर्माण...:अर्थव्यवस्थेत अँटिबॉडी; पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास 20.1%, बेस इफेक्टमुळे उसळी, म्हणजे गतवर्षी जून तिमाहीत विकास दर उणे होता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा विकास दर २०.१% राहिला. ही सर्वात मोठी उसळी आहे. त्यात बांधकाम आणि मॅन्युफॅक्चरिंग (विनिर्मिती) क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा आहे. याच दोन्ही क्षेत्रांना गतवर्षी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला होता. मात्र, या उसळीनंतरही जीडीपीचा आकार जून २०१९ च्या तुलनेत ९.१९% कमी आहे.

मात्र, आताच्या वृद्धीमुळे जुलै-सप्टेंबर तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्याचे संकेत मिळतात. जीडीपीत कृषी वगळता मोठा वाटा असलेल्या सर्व क्षेत्रांतील वाढ गतवर्षाच्या तुलनेत दुहेरी अंकांत आहे. कृषीत विकास दर ४.५% आहे. कारण, गतवर्षी याच एकमेव क्षेत्रात वाढ होती. इतर सर्व क्षेत्रांचा वृद्धिदर उणे होता. यामुळे आता सर्व क्षेत्रांत जास्त वाढ झाली आहे. कारण गेल्या वर्षी जून तिमाहीत त्यांचा बेस खूप घसरला होता. त्याच्याशी तुलना केल्यास या जून तिमाहीत जास्त विकास दिसत आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयानुसार, जून तिमाहीत ७.६८ लाख कोटींची निर्यात झाली. ती २०१९च्या तुलनेत ८% जास्त आहे. दुसरीकडे आयात ५.७% घटली आहे.

इम्युनिटीचा अर्थ असा : जीडीपी घटल्यामुळे गरिबी वाढते
- याच २ क्षेत्रांत गतवर्षी सर्वात मोठी घसरण झाली होती. यंदा कन्स्ट्रक्शनवर सर्वाधिक भर होता. यामुळे याच क्षेत्रात एकदाही लाॅकडाऊन लावण्यात आला नाही.
- गतवर्षी एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी ग्रोथ रेट उणे २४.४% राहिला होता. ती इतिहासातील सर्वात मोठी घसरण होती. कारण - कोरोना लॉकडाऊन.
- दुसऱ्या लाटेतही उत्पादनात वाढ झाली. कारण बाजारातील मागणीतील वाढ. खासगी गुंतवणुकीचेही कारण आहे. ती एकूण गुंतवणुकीचे ७०% राहिली.

एक्स्पर्ट व्ह्यू...
ही तेजी अर्थव्यवस्थेत हर्ड इम्युनिटी आल्याचे दाखवते

२०.१% चा विकास दर अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे चालू वित्त वर्षात ९.५%चा वृद्धिदर साध्य होऊ शकतो. यासोबतच भारत जी-२० देशांत सर्वाधिक वेगाने वाढणारा देश बनला आहे. मागणी वाढवण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीने सर्वाेत्तम निकाल दिले आहेत. पुरवठा क्षेत्रातही उद्योगांचे प्रदर्शन उत्तम आहे. एकूणच भारत आता मजबूत स्थितीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकल लॉकडाऊन लागला. मात्र त्याचा अर्थव्यवस्थेला पहिल्या लाटेतील लॉकडाऊनएवढा फटका बसला नाही. गेल्या एका वर्षात अर्थव्यवस्थेतही कोरोनाच्या परिणामांविरुद्ध इम्युनिटी (रोगप्रतिकार क्षमता) आली आहे.
डी.के. जोशी, मुख्य अर्थतज्ज्ञ, क्रिसिल, {सुजन हाजरा, मुख्य अर्थतज्ज्ञ, आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेस.

बातम्या आणखी आहेत...