आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वात मोठी तंत्रज्ञान कपंनी अॅपल कमी किमतीचे ‘एअरपॉड्स’ बाजारात आणणार आहे. त्यांचे ध्येय बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त इअरबड्सशी स्पर्धा करणे आहे. दिग्गज टेक कंपनी ‘एअरपॉड्स लाइट’ व्हर्जन तयार करत आहे. सध्या अॅपल बाजारात एअरपॉड्सचे चार मॉडल विकते. यात सेकंड जेन एअरपॉड्सपासून ते एअरपॉड्स मॅक्सचा समावेश आहे. हे लोकप्रिय आहेत मात्र महाग आहेत. हायताँग इंटरनॅशनल सिक्युरिटीजचे विश्लेष्क जेफ पु यांनी सांगिते, ‘या वर्षी एअरपॉड्सची मागणी घटण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये एअरपॉड्सचे शिपमेंट १३.७% घटुन ६.३ कोटी राहू शकते. गेल्या वर्षी २०२२ मध्ये ते ७.३ कोटींवर पोहोचले होते. मागणी कमी होण्यामागे कंपनीकडे दोन कारणे आहेत. सॉफ्ट एअरपॉड्स 3 च्या जास्त मागणीदरम्यान नवीन एअरपॉड्स लाँच न होणे. अॅपला या समस्येचा सामना करू इच्छित आहे.
भारतात १० हजार रुपयांपेक्षा कमी होऊ शकते किमत खरंतर, अजून एअरपॉड्स लाइटविषयी जास्त माहिती समोर आली नाही. मात्र पु यांच्या मते, लाइट मॉडेलची किमत १०० डॉलर (सुमारे ८,३०० रुपये) असू शकते. अशावेळी एअरपॉड्स त्या सर्वांपर्यंत पोहोचू शकते, ज्यांना अॅपलचे एअरपॉड्स महाग वाटतात. भारतात एअरपॉड्स लाइटची किमत १० हजारांच्या खाली येऊ शकते. सध्या अॅपल भारतात एअरपॉड्स- थर्ड जेन १९,९०० रुपयात विकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.