आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅपल आता अमेरिकेतच सिलिकॉन चिपचे उत्पादन करेल. आशियावरील उत्पादन अवलंबित्व कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याला दुजोरा दिला आहे. “अॅपलचे सिलिकॉन लवकरच आमच्या युजरसाठी कार्यप्रदर्शन नवीन स्तरावर घेऊन जाईल,” असे त्यांनी बुधवारी जाहीर केले. यापैकी काही सिलिकॉन चिपवर ‘मेड इन अमेरिका’ असा शिक्काही लावला जाऊ शकतो. जवळपास दशकभरात अॅपल पहिल्यांदाच यूएसमध्ये चिप बनवणार आहे. कुक म्हणाले की, अॅपल टीएसएमसीसोबत संबंध वाढवत आहे. टीएसएमसी जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट चिप मेकर आहे. अॅपलसाठी सिलिकॉन आधीच चिप बनवत आहे. तसेच सिलिकॉन अमेरिकेतील प्रमुख हार्डवेअर उत्पादकांसाठी चिपचा पुरवठा करणारा एक प्रमुख पुरवठादार आहे. टीएसएमसीची ४ हजार कोटी डॉलर (सुमारे ३.३० लाख कोटी रुपये) खर्च करून अमेरिकेत दोन प्रकल्प उभारण्याची योजना आहे. २०२४ मध्ये कामास प्रारंभ- फीनिक्स, अॅरिझोना येथे बांधला जाणारा त्यांचा पहिला प्रकल्प. २०२४ मध्ये कामास सुरुवात हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.