आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅप्पलचे भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर लवकरच मुंबईत सुरू होणार आहे. 'अॅप्पल BKC' असे या स्टोअरचे नाव असेल. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये हे स्टोअर उघडले जाईल.
ऑफिशियल टीझर जारी केला, लिहिले- 'हॅलो मुंबई'
अॅप्पलने मॉलमध्ये एक बॅनरल लावला आहे, त्यावर लिहिले आहे, 'अॅप्पल BKC'लवकरच येत आहे. कंपनीने अॅप्पल इंडियाच्या वेबसाइटवरही एक टीझर रिलीज केला आहे. यात लिहिले आहे, 'हॅलो मुंबई, आम्ही भारतातील आमच्या पहिल्या स्टोअरमध्ये तुमच्या स्वागतासाठी तयार होत आहोत.'
अॅप्पल स्टोअरविषयीच्या गोष्टीः
अॅप्पल डिव्हाइस एक्स्चेंज करता येतील
अधिकृत वेबसाइटनुसार स्टोअरमध्ये ग्राहक अॅप्पल डिव्हाइस एक्स्चेंज करू शकतील. याशिवाय, त्यांना स्टोअरमधून प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी अॅप्पल स्टोअर गिफ्ट कार्ड मिळतील. त्यांना जिनियस बारचाही पर्याय मिळेल. यात एक्सपर्ट सर्व्हिस आणि सपोर्ट दिला जातो. ग्राहक कोणत्याही डिव्हाइसची ऑनलाइन ऑर्डर देऊन स्टोअरमधून पिक करू शकतील.
टिम कूक यांनी 2020 मध्ये केली होती भारतात स्टोअर सुरू करण्याची घोषणा
कोरोना संकटामुळे भारतात अॅप्पल स्टोअर सुरू करण्यास उशीर झाला. 2020 मध्ये अॅप्पलच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीदरम्यान सीईओ टीम कूक यांनी म्हटले होते की त्यांची इच्छा नाही की भारतात कुणीतरी दुसऱ्याने आपला ब्रँड चालवावा. मात्र 2021 मध्ये स्टोअर उघडण्याची अॅप्पलची योजना कोरोनामुळे बारगळली होती.
अनेक वर्षांपासून अॅप्पलचे रिटेल पार्टनर मोठ्या आणि छोट्या शहरांत थर्ड-पार्टी स्टोअर चालवत आहेत. मात्र तसा अनुभव देऊ शकत नाही, जसा न्यूयॉर्कच्या 5th अव्हेन्यू, लंडनमधील रिजंट स्ट्रिट किंवा सिंगापूरच्या मरिना बेमध्ये मिळतो. अॅप्पल स्टोअर जगातील मोजक्या यशस्वी रिटेल आऊटलेटपैकी आहेत आणि फायदेशीर आहेत.
अॅप्पलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 2001 मध्ये व्हर्जिनियात पहिला अॅप्पल स्टोअर सुरू केला होता. तेव्हा अनेकांनी तो अयशस्वी होण्याची भविष्यवाणी केली होती. मात्र कंपनीचे स्टोअर उघडण्याची रणनिती खूप यशस्वी ठरली. अॅप्पलचे आता 500 हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. ज्यातील बहुतांश अमेरिकेत आहेत. यानंतर चीनचा क्रमांक येतो.
अॅप्पल भारत सरकारच्या PLI योजनेचा भाग
अॅप्पलचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर भारत सरकारच्या 41,000 कोटींच्या प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह स्किमचा भाग आहे. यानंतरच भारतात आयफोन मॅन्युफॅक्चरिंगने वेग पकडला. 2020 मध्ये भारत सरकारने PLI Scheme सुरू केली होती. या स्किममुशे बाहेरील देशातील कंपन्यांना स्थानिक मॅन्युफॅक्चरिंगचा फायदा घेण्याची संधी मिळते. सोबत त्यावर इन्सेन्टिव्हही कमाऊ शकतील.
भारतात 2017 पासून आयफोन बनत आहेत
अॅप्पलने 2017 पासून आयफोन SE सह भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले होते. यांचे तीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस पार्टनर- फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन आहेत. आयफोन SE नंतरच भारतात आयफोन 11, आयफोन 12, आयफोन 13 आणि आयफोन 14 ची मॅन्युफॅक्चरिंगही झाली. फॉक्सकॉनचा प्लान्ट चेन्नईजवळील श्रीपेरंबदूरमध्ये आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.