आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉइनबेसने एनएफटी सुविधा बंद केली, वापरकर्ते त्रस्त:अॅपलवर कठोर जाहिरात धाेरण तसेच उच्च शुल्कवसुलीचा आरोप

सॅन फ्रान्सिस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टो एक्स्चेंज क्वॉइनबेस ग्लोबलने मोबाइल व्हॉलेट नॉन फन्जीबल टोकन (एनएफटी) ट्रान्सफरची सुविधा बंद केली. मात्र वापरकर्ते अॅपमध्ये आपले एनएफटी पाहु शकतात. क्वॉइनबेसने ट्वीटमध्ये सांगितले की, क्वॉइनबेस व्हॉलेट आयओएसवर वापरकर्त्याचे एनएफटी पाठवु शकत नसल्याचे अॅप्पलचे जाहिराती धोरण आहे. अप्पलने त्यांचे अॅप ब्लॉक केले आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांचे एनएफटी ट्रान्सफर करणे अवघड झाले आहे. अप्पल इन-अॅप- फीच्या रूपात ३० टक्के कमीशन मागत असल्यामुळे असे झाले आहे. क्वॉइनबेसच्या म्हणण्यानुसार, त्याला किंवा इतर कोणत्याही ब्लॉकचेन तंत्रज्ञान कंपनीला अप्पलच्या जाहिरात धोरणांचे पालन करणे शक्य नाही. क्वॉइनबेसच्या मते, त्यांनी ऍपलला अॅपमधील शुल्क कमी करण्यास सांगितले, जे अॅप्पलने नाकारले.

बातम्या आणखी आहेत...