आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Apple Iphone| Bajaj Finserve| Five Ingredients That Make Apple Iphone 5G Segment Successful Featured Article On Bajaj Finance And Iphone 12

फीचर्ड आर्टिकल:'अ‍ॅपल'चा 5जी सेगमेंट तडका यशस्वी करणारे 5 घटक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपल’ने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत आपल्या 5जी-पॅकिंग आयफोन 12च्या यशासह जोरदार मुसंडी मारली. कंपनीच्या महसुलात 21% ने वाढ झाली आहे. आयफोन 12 या 5जी तंत्रज्ञान असलेल्या अ‍ॅपलच्या पहिल्या प्रॉडक्टच्या अमेरिकीतील विक्रीत 56% वाटा नोंदवण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन निश्चितच रेकॉर्ड ब्रेक विक्रीतील सुसाट पळणारा तगडा गडी ठरला.

अ‍ॅपलच्या या बेफाम यशासाठी काही घटक जबाबदार ठरले. त्यापैकी एक म्हणजे लोकांनी या अपग्रेडवर पटापट उड्या घेत मागणीचा आलेख चढा ठेवला. आता अ‍ॅपल’ने या खेळात शिरकाव केला म्हटल्यावर दिवसेंदिवस 5G smartphone (5जी स्मार्टफोन) च्या चर्चेला उधाण आले आहे.

ही यशोगाथा नेमकी आहे तरी काय ते सविस्तर जाणून घेऊ...

बाजारावर विस्तारीत ताबा

इतर 5जी प्रस्तावांचे अस्तित्व केवळ प्रादेशिक स्तरावर मर्यादित असताना अ‍ॅपल’ने बाजारावर विस्तारीत ताबा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले. चीन आणि जपानमध्ये Apple mobiles ची मागणी काहीशी अधिक बळकट आहे, या देशांसह 140 हून अधिक देशांत अ‍ॅपल उपलब्ध आहे.

त्याशिवाय, व्यापारातील विपणन धोरण आणि अमर्यादित योजनांसह आयफोन 12 च्या प्रोमोशनने विक्रीस हातभार लावला. याच धोरणाने एकट्या ऑक्टोबर महिन्यातच एक-तृतियांश विक्रीची नोंद झाली.

मिलीमीटर’ची लाट- सक्षम स्मार्टफोन

अलीकडे बाजारात आलेले आयफोन हे मिलीमीटर लाट म्हणजेच एमएम-वेव्हच्या जोरावर अधिक सशक्त झाले. अल्प-टप्प्याच्या, हाय-फ्रिक्वेन्सी नेटवर्क टेक्नोलॉजीने तुम्हाला 7 जीबीपीएसपर्यंतचा डेटा डाऊनलोड आणि 3 जीबीपीएसच्या डेटा अपलोड करण्याची क्षमता प्रदान केली. या एमएम-वेव्ह सज्ज 5जी स्मार्टफोनने मोठी लोकप्रियता मिळवली, जी ऑक्टोबर महिन्यात 12%पर्यंत वधारली.

5जी क्षमतेच्या दृष्टीने पुरेपूर साजेशा ठरलेल्या एमएम-वेव्हने आयफोनला 5जी अनलॉक करण्यासाठी खऱ्या अर्थाने क्षमता प्रदान केली. त्याशिवाय, एआर आणि व्हीआर सेगमेंट’मध्ये एमएम-वेव्हच्या ताकदीला आणखखी चालना देण्याची अ‍ॅपलची योजना आहे.

स्मार्ट डेटा मोड

अ‍ॅपल कायमच आपल्या ग्राहकांचे म्हणणे आपुलकीने आणि पद्धतशीररित्या ऐकत असते. आधीच्या 5जी फोनची बॅटरी लवकर संपत असल्याची, तसेच तो जास्त गरम होत असल्याची तक्रार आली. त्यावेळी अ‍ॅपलने स्मार्ट डेटा मोड नावाची इंटेलिजन्ट स्विचिंग सिस्टीम आणली.

या मॉडेलमध्ये आकर्षक वैशिष्ट्य आहे, जे फोनमधील डेटा फ्लोचे परीक्षण करते. ग्राहक 4जी वापरत असताना त्याला सुरळीत अनुभव मिळत होता किंवा 5जी वापरताना जास्तीचा ताण येतो आहे, हे या वैशिष्ट्यातून निश्चित करण्यात येते. त्यामुळे 5जी स्मार्टफोन गरज असताना त्या नेटवर्कवर जाऊन बॅटरीची शक्ती वाचवतात.

नेटवर्क विलंब

नेटवर्क लेटन्सी किंवा नेटवर्क विलंब हे आणखी एक सर्वोत्तम वैशिष्ट्य 5जी सेगमेंटमध्ये आयफोनकडून देण्यात येते. लेटन्सी किंवा विलंब म्हणजे नेटवर्कवर जाताना आणि त्या बदल्यात प्रतिसाद प्राप्त करताना लागणारा मधला कालावधी!

आयफोनवर 5जी लेटन्सीचा अर्थ 4जी आणि अगदी वाय-फायहून अधिक वेगवान नेटवर्कचा आनंद घेणे.

वाढीव जीवन कालावधी

5जी सेगमेंटमधील आयफोन उपभोक्त्यांना भविष्याची हमी देतात. याचा अर्थ, अगोदर 4 जी फोन खरेदी करताना दोन-वर्षांचे प्लान अल्प कॅरियरकरिता होते. काही वर्षांनी नवीन आवृत्या विकत घेण्याच्या दृष्टीने हे प्लान तयार करण्यात आले होते.

मात्र जेव्हापासून अमेरिकन स्मार्टफोन बाजारात ग्राहकांना कॅरियर कायम ठेवण्याऐवजी मासिक भरणा संधी उपलब्ध करून दिली, तेव्हा त्यांना दरवर्षी आपले फोन अद्ययावत करण्याची गरज उरली नाही. आता ते दोन वर्षांहून अधिक काळ फोन वापरू शकतात. कारण नवीन आयफोनचा जीवन कालावधी तीन ते चार वर्षांचा असेल.

त्यामुळे नवीन आयफोन विकत घेणाऱ्यांकरिता हे मोठे यश म्हणावे लागेल. ते भविष्यकालीन उत्पादनाची मजा लुटू शकतात. हा 4जी फोनच्या तुलनेत अधिक काळ चालेल. विश्लेषकांच्या मते, 5जी स्मार्टफोनची वेगाने विक्री होते आहे आणि आगामी तीन ते चार वर्षांत ते अधिक चांगले होतील.

याचा अर्थ आयफोन कुटुंबासाठी बरेच काही उपलब्ध आहे

लॉन्चला विलंब झाल्याने अ‍ॅपल’ने यंदाही आयफोन 12 सिरीजचा जल्लोष कायम ठेवण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय, आगामी काळात आणखी नवनवीन धडकेबाज वैशिष्ट्ये येणार आहेत.

एकेकाळी तुमचे चमकदार असलेले नवीनकोरे गॅजेट मध्येच लॅग झाल्याने कोणतीही हालचाल करण्यात तुम्हाला अडथळा आणते आहे का? तर मग तुम्ही साठवलेली मिळकत किंवा तुमच्या खिशाला जराही धक्का न लावता फोनची खरेदी कशी कराल ते जाणून घ्या. आता बजाज फिनसर्व नेटवर्क कार्डच्या माध्यमातून स्वत:ला नवीन मोबाईलची भेट देणे अगदी सोपे झाले आहे. आता मनातले अवघडलेपण बाजूला सारून तणाव-मुक्त खरेदीचा अनुभव घेण्यासाठी पुढे या.

या कार्डद्वारे उपभोक्ता सुलभ हप्त्यांवर नवीनकोऱ्या गॅजेटची खरेदी करू शकतात. हे कार्ड रु. 4 लाखांच्या पूर्व-संमत कर्ज प्रस्ताव (प्री-अप्रूव्हड लोन ऑफर) देऊ करते.

बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअर हे ऑनलाईन स्टोअर आहे. यावर मोबाईल, टॅब्लेट, घरगुती उपकरणे, गेमिंग आणि असेसरी, वेअरेबल आणि घड्याळे, कॅमेरे, संगीत आणि ध्वनी उपकरणे अशी लक्षावधी उत्पादने उपलब्ध आहेत.

त्याशिवाय यावर 3 ते 24 महिन्यांच्या कालावधीत परतावा करण्याचा सुपर फ्लेक्सिबल पर्याय उपलब्ध आहे. भारतभर 1 लाख+ स्टोअरच्या नेटवर्कसह बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअरवर खरेदीचे अनेक फायदे आहेत. ज्यावर नो कॉस्ट ईएमआय, खास सवलती, राऊंड-द-इयर ऑफर, किफायतशीर किंमती, वेगवान होम डिलिव्हरी, शून्य डाऊन पेमेंट आणि इतर बरेच लाभ मिळतात.

तर मग तुम्ही कसली खरेदी करताय? बजाज फिनसर्व ईएमआय नेटवर्क कार्डसह उपलब्ध ऑफर्सचा लाभ घ्या. बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअरवर लॉगिंग करून आत्ताच तुमच्या स्वप्नातील फोनची खरेदी करा.

बातम्या आणखी आहेत...