आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Apple IPhone VS Samsung; Premium Smartphone Market Sales Record, Latest News And Update  

लोकांना आवडू लागले महागडे फोन:प्रीमियम सेगमेंटच्या स्मार्टफोन विक्रीत विक्रमी 12% वाटा; आयफोन अव्वल, सॅमसंग दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात प्रीमियम स्मार्टफोनची विक्री झपाट्याने वाढली आहे. 30,000 पेक्षा जास्त किंमत असलेल्या प्रीमियम फोनचा वाटा जुलै-सप्टेंबर तिमाहीत विक्रमी 12% पर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, Apple चा iPhone-13 विक्रमी विक्रीसह या विभागात अव्वलस्थानी आला आहे. तर सॅमसंग दुसऱ्या तर वनप्लस तिसऱ्या स्थानावर आला आहे.

ऑगस्टपासून मागणी वाढली
काउंटरपॉइंट रिसर्चचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक प्रचीर सिंग यांनी सांगितले की, ऑगस्टपासून स्मार्टफोन बाजारात ग्राहकांची मागणी वाढू लागली. सप्टेंबरच्या तिमाहीत शेवटच्या आठवड्यात मध्यम आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये सणासुदीच्या काळात त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.

टॉप ब्रँड Mi चा मार्केट शेअर 27%

ब्रँडजुलै-सप्टेंबर 2021 मध्ये मार्केट शेअर

जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये बाजारातील हिस्सा

​​
Mi23%27%
सॅमसंग17%19%
वीवो15%14%
रिअलमी15%15%
ओपो10%10%
अन्य कंपनीचे फोन20%22%

भारतात पेगाट्रॉन iPhone 14 असेंबल करणार
Apple ने भारतात iPhone 14 असेंबल करण्यासाठी तैवानच्या Pegatron कंपनीची करार केला आहे. पेगाट्रॉनचा तामिळनाडूमध्ये कारखाना आहे. एप्रिलपासून पाच महिन्यांत भारतातून आयफोनची निर्यात 8,100 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

मार्च 2023 पर्यंत 20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र, चीनच्या तुलनेत भारतात अजूनही उत्पादन कमी आहे. गेल्या वर्षी सुमारे 3 दशलक्ष आयफोन भारतात बनवले गेले. तर 230 दशलक्ष चीनमध्ये बनवले गेले.

बातम्या आणखी आहेत...