आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Apple Is The World's First Company With A Market Value Of 3 Trillion, More Than The GDP Of 198 Countries | Marathi News

ॲपल:हटके विचारांच्या कार्यसंस्कृतीमुळे ॲपल 3 लाख कोटी डॉलर्स मार्केट व्हॅल्यूची जगातील पहिली कंपनी, हा आकडा भारतासह 198 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 वर्षात ॲपलच्या महसुलात सर्वाधिक 54 टक्के वाटा एकट्या आयफोनचा आहे.

सुमारे ४५ वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात गॅरेजमध्ये सुरू झालेली ॲपल बाजारमूल्य ३ लाख कोटी डॉलर्सपार (सुमारे २२५ लाख कोटी रु. ) पोहोचलेली जगातील पहिली कंपनी ठरली आहे. हा आकडा भारतासह १९८ देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. ॲपलचे शेअर्स ३% उसळून १८२.८८ डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या कमाईत ५०% पेक्षा जास्त वाटा आयफोनचा आहे. तथापि, मीडियाच्या उगवत्या क्षेत्रांत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ४ पट कमी गुंतवणुकीनंतरही कंपनी टॉप-५ मध्ये आहे. कारण-कंपनीची वेगळी विचारसरणी. ॲपलची मार्केट व्हॅल्यू आता फक्त ५ देशांच्या (अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, ब्रिटन) जीडीपीपेक्षा कमी आहे.

ॲपलच्या डीएनएत आहे ‘थिंक डिफरंट’, मग डिझाइन असो की मॅनेजमेंट
- ॲपल कधीच बाजारातील उत्पादनांशी स्पर्धा करत नाही, उलट ती स्वत:चे वेगळे उत्पादन आणण्यावर विश्वास ठेवते. मग ते एमपी ३ प्लेअर असो, टॅब्लेट असो, स्मार्टफोन असो, इअरपॉड असो, वाॅच असो की कॉम्प्युटर.
-इतर कंपन्यांप्रमाणे ॲपलमध्ये निर्णय घेण्यासाठी अनेक समित्या नसतात. ॲपलमध्ये एक केंद्रीय कार्यकारी समिती काम करते. ती प्रॉडक्टचे डिझाइन व ते प्रत्यक्ष तयार करण्यासाठी सातत्याने सोबत करत करते. हीच समिती अंतिम निर्णय घेते.
- हार्डवेअर, आॅपरेटिंग सिस्टिम व ॲप्लिकेशन्स स्वत: ॲपलचेच असतात.
- ॲपलमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे- डिझाइन. ॲपलचे माजी कार्यकारी टोनी फेडेल म्हणाले, ॲपलच्या डिझाइनला टक्कर कशी द्यावी, हे नेहमीच विचारले जायचे. त्यावर ते म्हणायचे, ॲपलची कॉपी करणे बंद करा व स्वत:च्या डिझाइनवर फोकस करा. जॉब्ज यांनी ॲपलच्या डीएनएत डिझाइन असे पेरले आहे की, प्रत्येक प्रॉडक्टमध्ये ते उमटते.

येथेही दबदबा... ॲपल म्युझिक जगात दुसऱ्या स्थानी, ॲपल टीव्ही+ दोन वर्षांतच चौथ्या स्थानी; तरीही स्पर्धकांपेक्षा ४ पट कमी गुंतवणूक
ॲपलने सुमारे २१ वर्षांपूर्वी आयट्यून लाँच करत म्युझिक इंडस्ट्रीत खळबळ उडवली होती. कंपनीने पुन्हा मीडिया इंडस्ट्रीत मुसंडी मारली. २०१५ मध्ये लाँच झालेले ॲपल म्युझिक आज स्पॉटिफायनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ५.५ कोटींपेक्षा जास्त, तर स्पॉटिफायचे १५ कोटींवर सबस्क्रायबर आहेत. इतकेच नव्हे तर केवळ २ वर्षांपूर्वी आलेला ॲपल टीव्ही+ जगातील चौथा सर्वात मोठा व्हिडिओ सेवा प्रदाता बनला आहे. या यादीत नेटफ्लिक्स प्रथम, िडस्ने-हॉटस्टार द्वितीय व ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ तृतीय स्थानी अहो. १९१ अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रोकड हाती असलेली ॲपल वाटल्यास आपल्या स्पर्धकांना केव्हाही मागे टाकू शकते. पॅरेट ॲनालिटिक्स डेटा कंपनीच्या ज्युलिया ॲलेक्झांडर म्हणाल्या, मीडिया इंडस्ट्रीत ॲपल इतर स्पर्धकांसारखी आक्रमक नाही. कारण तिचा फोकस दुसऱ्या उद्योगांवर आहे. येथे फक्त ती सहायक कलाकाराच्या भूमिकेत राहू इच्छिते. ॲम्पियर ॲनालिसिस रिसर्च कंपनीनुसार, २०२१ मध्ये ॲपलने चित्रपट व टीव्हीवर फक्त २ अब्ज डॉलर्स खर्चले. ॲमेझॉनने ९ अब्ज डॉलर्स व नेटफ्लिक्सने १४ अब्ज डॉलर्स खर्च केले. २०२१ मध्ये अवघ्या जगात रेकॉर्डेड म्युझिक इंडस्ट्रीने २२ अब्ज डॉलर्स कमावले, तर दुसरीकडे ॲपलने आयपॅडमध्येच यापेक्षा जास्त कमाई केली.

जे लोक एखाद्या गोष्टीकडे वेगळेपणाने पाहतात ते नियमांची पर्वा करत नाहीत. तुम्ही त्यांच्याशी सहमत किंवा असहमत असू शकता, त्यांचे कौतुक करता किंवा निंदाही करू शकता. परंतु, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू शकत नाही. - स्टीव जॉब्ज, सह-संस्थापक व माजी सीईओ, ॲपल

बातम्या आणखी आहेत...