आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅपल भारताला एका वेगळ्या सेल्स रिजनमध्ये रूपांतरित करत आहे. कंपनीत भारतीय बाजाराला खूप महत्त्व दिले जात आहे. येथील शक्यता लक्षात घेऊन कंपनी नेतृत्व रचनेत बदल करत आहे. भारतात अॅपलची विक्री आणि उत्पादनावर वेगळे लक्ष ठेवण्याचा यात हेतू आहे. भारत, मध्य पूर्व, मेडिटेरेनियन, पूर्व युरोप आणि आफ्रिकी बाजारासाठी अॅपलचे व्हाइस प्रेसिडेंट इन चार्ज ह्यूजेस एसेमन निवृत्त झाले आहेत. आता ही जबाबदारी इंडिया हेड आशिष चौधरींकडे देण्यात आली आहे. चौधरी आतापर्यंत एसेमन यांना रिपोर्ट करायचे. आता ते अॅपलचे प्रॉडक्ट सेल हेड मायकल फेंगर यंाना रिपोर्ट करतील. सूत्रांनी सांगितले, कंपनीचे हे पाऊल भारताचे वाढते महत्त्व दाखवते.
भारतात विकले जाणारे सर्वाधिक महाग फोन अॅपलचे {भारतात स्मार्टफोनचे प्रीमियम सेगमेंट आणि अल्ट्रा प्रीमियममध्ये अव्वल आहे. {गेल्या वर्षी भारताच्या स्मार्टफोन बाजारात आयफोन १३ सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल ठरले.
{ डिसेंबर तिमाहीत अॅपल शिपमेंट व्हॅल्यूच्या दृष्टीने बाजारात अव्वल राहिली.
{ अॅपल भारतात आयफोन १४ व आयफोन १४ प्लससह नॉन प्रो-व्हेरिएंटचे उत्पादन करते.
{अॅपलने भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू केले. यावर्षी रिटेल स्टाेअर सुरू करणार. {चीनमध्ये सर्वाधिक आयफोन बनतात. मात्र सप्लायर्स आता भारतात प्लांट लावताहेत.
अॅपल भारतातून सर्वाधिक निर्यात करणारी स्मार्टफोन कंपनी डिसेंबर तिमाहीत अॅपलचे उत्पन्न ५% घटून ११७.२ अब्ज डॉलर झाले. मात्र, या काळात भारतात कंपनीने वार्षिक १६% वाढीसह विक्रमी कमाई केली. डिसेंबरमध्ये कंपनीने भारतातून ८२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केले. भारतात ही कामगिरी करणारी अॅपल ही पहिली कंपनी आहे. यामुळे भारतात त्यांना जास्त शक्यता दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.