आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Apple Steve Jobs I Birkenstock Sandals Auction | Julien's Auctions Latest News I 

स्टीव्ह जॉब्स यांच्या 42 वर्षांपूर्वीच्या सँडलचा लिलाव:64 लाखांपेक्षा जास्त किंमत लिलावात मिळण्याची अपेक्षा; 13 नोव्हेंबर पर्यंत लिलाव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या अ‌ॅपलचे चेअरमन, सीईओ आणि सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या 42 वर्षांपूर्वीच्या सँडल जोडीचा लिलाव होत आहे. स्टीव्ह जॉब्स 'ब्राऊन सुड लेदर बर्केनस्टॉक अ‌ॅरिझोना सँडल्स' वापरत असत, जी आता लिलाव करणारी कंपनी 'ज्युलियन ऑक्शन्स' च्या अधिकृत वेबसाईडवर लिलावासाठी ठेवली गेली आहे.

सँडलला 64.43 लाखांपर्यंत मिळू शकते किंमत
ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळानुसार, स्टीव्ह जॉब्सच्या सँडलचा 60 हजार ते 80 हजार डॉलर्स म्हणजेच 48.32 ते 64.43 लाख रुपयांना लिलाव होऊ शकतो. ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावर सॅंडलचे फोटोही शेअर करण्यात आलेले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टीव्ह जॉब्सचे ब्राउन सँडल खूप जुने दिसत आहेत.

13 नोव्हेंबरपर्यंत चालणार सॅंडलचा लिलाव
11 नोव्हेंबर रोजी या सँडलचा थेट लिलावाला सुरूवात झाली आहे. तर ही लिलावाची प्रक्रिया 13 नोव्हेंबरला संपणार आहे. ज्युलियनच्या वेबसाइटवरील ताज्या तपशीलानुसार, सँडलची बोली $15,000 (रु. 12.08 लाख) पासून सुरू झाली. यानंतर, सध्या 22,500-22,500 डॉलर्स (18.12 लाख रुपये) साठी दोन बोली लावण्यात आल्या आहेत. आता स्टीव्ह जॉब्सच्या सँडलची बोली किती पुढे जाणार हे पाहणे एक पर्वणीच असणार आहे.

सत्तरच्या दशकात वापरत होते ही सॅंडल

ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावरील तपशीलानुसार, स्टीव्ह जॉब्सने 1970 ते 1980 च्या दशकात या सँडलची जोडी घातली होती. यानंतर बर्कनस्टॉक सँडलची ही जोडी स्टीव्ह जॉब्सचे गृह व्यवस्थापक मार्क शॅफ यांनी ठेवली होती.

सँडल स्टीव्हच्या सामान्य दिसण्याचा भाग
एका मुलाखतीत स्टीव्ह जॉब्सची पत्नी क्रिसन ब्रेनन यांनी जॉब्सच्या कपड्याच्या, राहण्याच्य शैलीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, 'सँडल स्टीव्हच्या साधेपणाचे लक्षण होते. ही त्याच्या साधेपणाची बाजू होती. तुम्हाला सकाळी काय घालायचे, याची चिंता करण्याची गरज पडत नाही.

सँडलमुळे ते स्वतःला उद्योगपती समजत नव्हते

क्रिसन ब्रेनन पुढे अशाही म्हणाल्या होत्या की, ​​​​​​स्टीव्ह कधीही इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काहीही नवीन शोधत नव्हता. अर्थात खरेदी करीत नव्हता. त्यांनी केवळ मनाला जे पटेल किंवा व्यवसायात जे चांगले दिसेल या अनुषंगाने ते कपडे परिधान करित असत. सॅंडलमध्ये त्याला कधीही मोठा व्यावसायिक असल्याचे भाव येत नाही. त्याला सर्जनशील विचार करण्याचे स्वातंत्र्य होते.

अ‌ॅपलच्या महत्त्वपुर्ण क्षणी स्टीव्हच्या पायात ही सॅंडल
अ‌ॅपलच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या ‌क्षणांमध्ये जॉब्सने या सँडल घातल्या होत्या, असे लिलाव करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. वेबसाईडवर लिहिले आहे की, अ‌ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासोबत 1976 मध्ये त्यांच्या लॉस अल्टोस गॅरेजमध्ये ऍपल कॉम्प्युटर लॉंच करताना स्टीव्ह जॉब्स यांनी ही चप्पल घातली होती. ही चप्पल तो अधूनमधून ते घालायचे.

बातम्या आणखी आहेत...