आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलने निर्यात केले 8,100 कोटींचे फोन:अॅपल भारतातील उत्पादन सध्याच्या 5-7% वरून 25% पर्यंत वाढवू इच्छित आहे

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपल भारतातून एका महिन्यात एक अब्ज डॉलर (८,१०० कोटी रुपये)पेक्षा स्मार्टफोन निर्यात करणारी पहिली कंपनी ठरली आहे. देशाच्या स्मार्टफोन इंडस्ट्रीसाठी डिसेंबर खूपच चांगले ठरले. गेल्या महिन्यात भारतातून १०,००० कोटी रुपयापेक्षा जास्तीचे मोबाइल फोन निर्यात केले. यात अॅपल आणि सॅमसंगची सर्वात जास्त भागीदारी राहिली. मात्र निर्यातीच्या बाबतीत अॅपलने सॅमसंगला मागे सोडले. अॅपल भारतात मॅन्युफॅक्चरिंग सलग वाढवत आहेत. तैवानच्या डिजीटाइम्सचे अॅनालिस्ट ल्युक लीनच्या मते, भारत २०२७ पर्यंत जगातील प्रत्येक दोनपैकी एक आयफोन तयार करू शकतो. सोमवारी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीदेखील सांगितले, अॅपल भारतातील उत्पादन सध्याच्या ५-७% वरून २५% पर्यंत वाढवू इच्छित आहे. चालू आर्थिक वर्षात भारताकडून ७३ हजार कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची निर्यात होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...