आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई भाडे:पीक सीझनमध्ये मनमानी विमान भाड्याला बसू शकतो आळा

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाधिक प्रवासाच्या हंगामात, विमान कंपन्या सहसा अचानक भाडे वाढवतात. त्यामुळे परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीवर संसदेच्या स्थायी समितीने चिंता व्यक्त केली आहे. समितीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला हवाई भाड्याचे किमान आणि कमाल मर्यादा निश्चित करण्याचे सांगितले आहे.

संसदीय समितीला पीक ट्रॅव्हल सीजनच्या काळात हवाई तिकिटांच्या कीमतीत अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. वाढते हवाई भाडे नियंत्रित करण्यासाठी उड्डयन मंत्रालयाकडे एखादी ठोस व्यवस्था नसल्याचे समितीच्या निर्देशनास आले. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा फायदा घेत मनमानी भाडे निश्चित करणे टाळावे, असा सल्ला संसदीय समितीने एअरलाइन्सला दिला आहे. समितीच्या मते, एअरलाइंसच्या कमर्शियल हित आणि प्रवाशांच्या हितांमध्ये संतुलन असायला हवे. संसदेत सादर केलेल्या अहवालात समितीने म्हटले की, खाजगी विमान कंपन्यांनी भाड्याबाबत योग्य माहिती प्रसिद्ध केली नाही तर त्यांना शिक्षा व्हायला हवी.

सरकारने ऑगस्टमध्ये मर्यादा घातली होती सरकारने एअरलाइन्सवर किमान आणि वाढलेल्या भाड्याविषयी मर्यादा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काढून टाकली होती. यापूर्वी २५ मे २०२० रोजी सरकारने कोरोनानंतर विमानसेवा पूर्ववत झाल्यावर देशांतर्गत विमान कंपन्यांवर ही मर्यादा घालण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...