आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य लढ्यात उद्योजकांची भूमिका:अर्देशिर गोदरेज यांनी गांधीजींना दिला होता ‘स्वदेशी’चा विचार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजींच्या भेटीत आर्देशिर गोदरेज खूप प्रभावित झाले होते. दोघांच्या नेहमी भेटी होत असत. बी. के. करांजिया आपले पुस्तक ‘गोदरेज: अ हंड्रेड इयर्स’मध्ये लिहितात, दोघेही देशाच्या स्वातंत्र्याचा करत होते, पण माध्यमांवरून दोघांची भिन्न मते होती. गांधीजी राजकीय लढ्याच्या बाजूने होते, तर जोपर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य दिवास्वप्नच राहील, यावर अर्देशिर यांना विश्वास होता. भारताच्या गरजेच्या वस्तू भारतातच तयार व्हाव्यात, असे त्यांचे म्हणणे होते. भारताची पारंपरिक शिल्पकला त्यांचे विचार आणखी मजबूत करत होती. गांधीजींच्या आंदोलनांना दीर्घकाळ अपेक्षेनुसार वेग मिळाला नाही. त्यावेळी स्वदेशीचा अवलंब केल्याने इंग्रजांचे हात कमजोर होतील व भारताची अर्थव्यवस्था बळकट होईल, हे समजावून सांगण्यात अर्देशिर यशस्वी ठरले. स्वदेशी पुढे चालून भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानात व स्वातंत्र्याच्या लढ्यातही प्रमुख शस्त्र ठरले. अर्देशिर यांना स्वदेशीचे वेड होते. त्यांनी भारतात तिजाेरी बनवण्याचा पहिला कारखाना सुरू केला. त्यापूर्वी ते सर्व मोठ्या विदेशी तिजोऱ्यांतील उणिवा पाहून आले होते. या उणिवा दूर करत त्यांनी तिजोरी बनवली. ती इतकी सुरक्षित होती की, चोरी होणे तर दूरच, पण आगीत जळाल्यानंतरही यातील सामान सुरक्षित राहत होते. पाहता पाहता देशाच्या ९२% बाजारावर गोदरेजने ताबा मिळवला. नंतर त्यांनी साबणाची निर्मिती केली. तेवाह सर्व कंपन्या जनावरांच्या चरबीपासून साबण बनवत असत. गोदरेज यांनी पहिल्यांदा वनस्पती तेलापासून साबण बनवला.

बातम्या आणखी आहेत...