आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Arshad Warsi Stock Market Fraud Case; SEBI Bans Arshad Warsi | Stock Manipulation Via Youtube

अभिनेता अर्शद वारसीसह 45 जण शेअर बाजारातून बॅन:व्हिडिओ अपलोड करून दोन शेअर्स मॅनिप्युलेट केले; 5 रुपयांचा स्टॉक 33 रुपयांवर गेला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांच्यासह 45 व्यक्ती आणि कंपन्यांना सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) सिक्युरिटी मार्केटमधून बॅन केले आहे. त्यांनी यूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करून शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याच्या आरोपांच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

साधना आणि शार्पलाइन खरेदी करण्याचा दिला होता सल्ला

काही यूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंद्वारे दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार होत असल्याचे सेबीला आढळून आले. गुंतवणूकदारांना अपवादात्मक नफ्यासाठी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडचे ​​शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला. साधना ब्रॉडकास्टप्रकरणी वारसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्यात आली आहे.

अर्शद वारसीने कमावले 29.43 लाख

साधनाचे काही प्रवर्तक भागधारक की मॅनेजमेंट पर्सनल (KMP), आणि नॉन-प्रमोटर शेअरहोल्डर्स, ज्यांचे कंपनीत 1% पेक्षा जास्त शेअरहोल्डिंग होते, त्यांनी त्यांच्या होल्डिंगचा मोठा भाग फुगवलेल्या किमतीत विकला आणि नफा वसूल केला. अर्शद वारसीने 29.43 लाख, मारिया गोरेटीने 37.56 लाख आणि इक्बाल हुसेन वारसीने 9.34 लाखांचा नफा कमावला.

साधनाचा शेअर 5.70 रुपयांवरून थेट 33.20 रुपयांवर पोहोचला

20 मे 2022 रोजी साधना ब्रॉडकास्टच्या शेअरची किंमत 5.70 रुपये होती. 12 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची किंमत 33.20 रुपयांपर्यंत वाढली. 15 फेब्रुवारीला हा दर पुन्हा 5.50 रुपयांवर आला. प्रवर्तकांनीही चढ्या भावाने शेअर्स विकले. दुसरीकडे, शार्पलाइन ब्रॉडकास्टच्या शेअरची किंमत 25 मार्च 2022 रोजी 7.35 रुपये होती. 13 जून 2022 रोजी दर वाढून 53.30 रुपये झाला. त्यानंतर 2 मार्च 23 रोजी किंमत परत 6.80 रुपयांवर आली.

दोन्ही कंपन्यांचे संचालकही एकच

संजीव कुमार झा हे दोन्ही कंपन्यांचे संचालक आहेत. याशिवाय, दोन्ही कंपन्यांचे वैधानिक लेखापरीक्षक हे BAS & Co. LLP आहेत. दोन्ही कंपन्यांचे सेक्रेटरीयल ऑडिटरदेखील ए. व्ही. कुमार अँड असोसिएट्स आहेत. रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटदेखील स्कायलाइन फायनान्शिअल आहे. तर साधना ब्रॉडकास्टमध्ये शार्पलाइन ब्रॉडकास्टचा 9.4% हिस्सा आहे.

तक्रार आल्यानंतर सेबीने तपास सुरू केला

सेबीकडे तक्रारी आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. काही संस्था साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअर्सचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी यूट्यूब चॅनेलवर दोन्ही कंपन्यांचे दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचा आरोपही तक्रारींमध्ये करण्यात आला आहे.

शेअर्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममध्ये अचानक वाढ

SEBIला आढळले की एप्रिल ते जुलै 2022 दरम्यान दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती आणि व्हॉल्यूममध्ये अचानक वाढ झाली. जुलै 2022 मध्ये Advisor आणि Moneywise या दोन YouTube चॅनेलवर साधना ब्रॉडकास्टचे खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडचे ​​व्हिडिओ मे 2022 मध्ये मिडकॅप कॉल आणि प्रॉफिट यात्रा या दोन यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते.

दोन्ही यूट्यूब चॅनेल आता बंद

यूट्यूब व्हिडिओमुळे साधना ब्रॉडकास्टमधील लहान भागधारकांची संख्या 2,167 वरून 55,343 पर्यंत वाढली आहे, ज्यांनी फुगलेल्या किमतीत शेअर्स खरेदी केले. शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या बाबतीत, लहान भागधारकांची संख्या 517 वरून 20,009 पर्यंत वाढली आहे.

अदानी समूहाने साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड विकत घेतल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. हे वाहिन्या चॅनल्स आता बंद करण्यात आले आहेत. त्यातील कॉमेंट्स बंद ठेवण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...